आकाशीय किंवा विज्ञानमय प्रतल व त्यामधील तत्त्व हा एक भौतिक प्रतलाचाच विस्तारित भाग आहे असे समजले जाते. जरी ते आपल्याला अदृश्य असले तरी ते भौतिकतेचाच विस्तारित भाग आहे. आकाशीय दृष्टी ही भौतिक दृष्टीहून कितीतरी पटीने अधिक विकसित असलेली दृष्टी आहे. आकाशीय मानव अथवा ज्यांना आकाशीय दृष्टी आहे; त्यात बंद असलेल्या पुस्तकातील उतारे वाचणे, त्यातील वस्तूंचे वर्णन करणे, कुठल्याही काळातील मानवांचा कुठेही न जाता शोध घेणे इत्यादी. खऱ्या गूढवाद्यांकडे अजून एका विशिष्ट अशा दुसºया विद्येचा संच असतो. ज्यात आकाशीय प्रतलांच्याही वरील प्रतलांचा संबंध येतो. आकाशीय गूढता समजण्यासाठी सहानुभूतीपूर्ण दृष्टी व लपलेली ऊर्जा यांचा उपयोग केला जातो. ही कंपने भौतिक प्रतलावर उत्पन्न करण्यासाठी कार्य करावे लागते.
आकाशीय प्रतलावरील सहानुभूतीपूर्वक कंपनांचा आपल्या जगातील कंपनांपेक्षा अधिक परिणाम होतो. कारण आकाशीय तत्त्व हे जास्त सुस्त असते, त्यातील कंपने ताकदवान असतात. ज्याला माहीत असते तो याचा उपयोग वेगवेगळे परिणाम करण्यासाठी वापरतो. ज्याला लांबी, रुंदी, उंची असल्यामुळे भौतिक डोळ्यांनी जो त्रिमितीमध्ये दिसतो, अशा ठोकळ्याचे हे उदाहरण आहे. बाजूने मोठे करून जर बघितले तर आपल्याजवळील बाजू लांब असलेल्या बाजूपेक्षा आपल्याला मोठी दिसते. जर हाच ठोकळा आपण आकाशीय प्रतलावर आकाशीय दृष्टीने बघितला तर त्याच्या सर्व बाजू आपल्याला एकाच वेळी सारख्याच मापाच्या दिसून तो खरा जसा असतो तसाच दिसेल. वस्तूचा प्रत्येक बिंदू जिवंत किंवा मृत जो आपल्या भौतिक प्रतलावर असतो, त्याची हुबेहूब नक्कल आकाशीय प्रतलावर असून तो अत्यंत गुंतागुंतीच्या अशा आकाशीय तत्त्वाचा बनलेला असतो. हे आकाशीय तत्त्व आपल्या चार मितीलाच फक्त दिसू शकते. सर्व जिवंत तत्त्वांना एका पोकळीसारखे तेजस्वी अंडाकृती असे धुके ज्याला आवरण म्हणतात ते व्यापून असते. हे अत्यंत गुंतागुंतीचे असून विविध रंगांचे व आकारांचे त्या माणसाच्या प्रकृतीप्रमाणे असते.
याबरोबरच आकाशीय दृष्टी जो भौतिक शरीराची बरोबर दुसरी प्रत असतो तो प्राणमय कोशही बघू शकतो. तो प्राणमय तत्त्वांचा बनलेला असतो. तो खरंतर एक साचा असतो ज्यावर आपले भौतिक शरीर स्थिरावलेले असते. कर्माचा सिद्धांत, कारणाचा वैश्विक सिद्धांत व त्याचे परिणाम हे भौतिक आवरणाचा प्रकार व त्याचे घडणे ठरवत असते.मेहरा श्रीखंडे