मनापासून संतस्तुती करणे आपल्या यशस्वी साफल्यासाठी सर्वसुलभ असते. नामसंकीर्तनाची महती करणे असले की, सगुण-निर्गुण भक्ती असेल, या सर्वांसाठी ‘मन’ महत्त्वाची भूमिका बजावते. मनाचा आविष्कार निरनिराळा असला तरी त्याचा परिमाण निश्चितपणे वेगळा जाणवतो. प्रत्येक भूमिकेसाठी मनाचा नितांत रमणीय असा भावविशेष असतो. संतमंडळी आपल्याा मनाला आपल्या उपास्य वैदताबरोबर प्रेमाने राहायला सांगतात. मनाच्या करुणेतून भक्तिपेमाचा पाझर फोडतात. त्यांची पदे किंवा अभंगवाणी मनाचा अविर्भाव असतो. सतत चिंतन-मनन करणारे ‘मन’ साहित्यातून प्रकट होते. वाडमयाद्वारे संताचे मन जाणता येते. भक्त आणि भगवंत यांच्या विरहभावातून मनाची कल्पना मांडता येते. तत्कालीन परिस्थितीचे पडसाद उमटलेले असतात. संताचे अंतरंग बारकाईने अवलोकन केले तर त्यांच्या समर्थ व विचारी मनाचा ठाव घेता येतो. संतानी माता-पिता, गुरु धेनू-वत्स, समाज यातील अनेक उदाहरणातून संताच्या हळव्या व परिवर्तनवादी मनाचा मूलमंत्र व्यक्त झालेला दिसतो.
संताच्या जीवनकार्याचा व वाडमयीन वैशिष्ट्यांचा आरसा म्हणजे त्यांचे सामर्थ्यशील मन होय. संताचे विचारमंथन मनाला सर्वांगीण जीवनाच्या वाटेवर जाण्यासप्रवर्त करते. अंत:करणातील खऱ्या इश्वरतत्वांचा शोध मनाच्याद्वारेच घेता येतो. ‘‘जो-वरी-मी-माझे न तुटे-तंव आत्माराम कैसेनि तून जाणवत असतो. संताच्या मनाचा भाव प्रेमरसगोडी निर्माण करतो. देव-भक्तपणाच्या कल्पना ते न अनुभवते. आत्मानंदी रंगलेल्या मनाला निरुपम असा हृयसंवाद साधता येतो. संताचे ‘मन’ पावन झालेले असते. त्यांच्या मनातून स्पष्ट विचार बाहेर पडतात. प्रसंग ते देवाला प्रेमाने आळवतात व प्रसंगी कोमल शब्दाऐवजी परखडपणे बोलताना दिसतात. समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संतमनाची नितांत गरज आहे. एका विशिष्ट ठिकाणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला नियंत्रणात संताचे मन आणू शकते. त्यांचा विचार त्या काळात प्रभावी ठरतो. म्हणून संत मनाची-संतसंगतीची इच्छा सदैव सज्जनपुरुष करतात. संताचे मन सूर्यकिरणाप्रमाणे आत्मज्ञानाचा प्रकाश देत असते.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)