शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

आनंद तरंग - विषयांचे कुरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 1:12 AM

इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो

प्रा. शिवाजीराव भुकेलेरिमझिम बरसणाऱ्या सरीने धरणीमातेवर हिरवीगार शाल पांघरावी, लवलवत्या तृण पात्यांनी आपल्या रसिल्या रूपात साºया पशू-पक्ष्यांना आणि माणसाससुद्धा साद घालावी; पण एखाद्या मालकाने तरण्याबांड ‘खोंडास’ हिरव्या कुरणाजवळच खुंटाला बांधावे; पण भुकेचा आगडोंब उसळू लागला अन् हिरव्यागार गालिचाचे ‘कुरण’ खुणावू लागले की, ‘खोंड’ खुंट्यासहित आणि ‘दाव्या’सहित उसळी घेऊन हिरव्या कुरणावर ताव मारते. आता यात दोष त्या ‘खोंडाचा’ की त्याच्या मालकाचा, हा प्रश्न अलहिदा; पण आज अध्यात्माच्या नावाखाली विषय दमनाच्या ‘खुंट्याला’ सर्वसामान्यास बांधणाºया अनेक महागुरूंची अवस्था त्या मालकासारखी आणि शिष्यांच्या भाऊगर्दीची अवस्था तरण्याबांड खोंडासारखी झाली आहे. एकेकाळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांवर साधक जाता-जाता विजय मिळवायचा; कारण त्याच्याभोवती विषयरूपी हिरवेगार कुरण खूपच कमी प्रमाणात असायचे; पण आज मात्र सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सुरा, सुंदरी यांची हिरवीगार कुरणे साधक आणि सिद्ध म्हणवून घेणाºया मंडळींच्या भोवतीने नंगानाच घालीत आहेत. यामुळे गुरूच विषय विकारात गुरफटले जात आहेत. त्यावर बाजी मारण्याचे काम शिष्य करीत आहेत. या विषयाकडे धाव घेण्यापूर्वी ती मनातच येऊ नयेत, अशी प्रार्थना करताना विश्वज्योती महात्मा बसवेश्वर म्हणाले होते -विषयरूपी हिरवेगार कुरण, आणुनी माझ्यापुढेपशूला काय कळते, ते तर हिरवळीकडे ओढ घेणारचविषयरहित करूनि, भक्ती रस आकंठ पाजुनीकृपादृष्टीने पहा हे कुडलसंगम देवा ॥संयमाचे बांध सैल झाले की, इंद्रियांना पंचविषय प्राणापेक्षाही प्राणप्रिय वाटू लागतात, असे म्हणतात. कावीळ झालेल्या माणसाला सारे जगच पिवळे दिसायला लागते, तसे विषयभक्त परायणमंडळींना सारे जगच विषयासक्त वाटायला लागते. स्वार्थ, संपत्ती, सौंदर्य व सत्तेच्या विषयाची धुंदी चढली की, आपल्या पलीकडचे सारे जगच धूसर वाटायला लागते. इंद्रियांना जेव्हा विषय सेवनाचे वळणच पडून जाते, तेव्हा संबंधित विषयाची पूर्तता झाली तर आनंद निर्माण होतो अन् पूर्तता नाही झाली तर निर्माण होणारा विवाद आपल्याला नाही तर कुणालाच नाही, या भावनेने सभोवतालच्या वातावरणाला अशांततेची चूड लावतो. मानवास शाश्वत सुख देणे हा मुळात विषयाचा धर्मच नाही. जसे रोहिणी नक्षत्रात डोंगरमाथ्याच्या पायथ्याशी निर्माण झालेले मृगजळ पाहून ‘मृगास’ वाटते, या ‘मृगजळा’च्या गंगेत पाणी पिल्यावर आपली तहान निश्चित भागेल. म्हणून ते सैरावैरा धावू लागते व धावून-धावून ऊर फुटून मरून जाते. अगदी तसेच विषयाच्या मृगजळापाठीमागे धावून सुख मिळेल म्हणून विषयी माणसे रात्रंदिवस त्या पाठीमागे धावत राहतात आणि अपूर्णतेच्या शापातच मरून जातात. सुख आणि विषय यांचा तसा अर्थाअर्थी कुठेही संबंध नाही. नव्हे, विषयामुळे साधा सुखाचा भाससुद्धा निर्माण होत नाही. कारण परमसत्याचा शोध घेण्यासाठी केला जाणारा विचार हाच शाश्वत सुखाचा राजमार्ग आहे. जर तिथंपर्यंत आपणास पोहोचता येत नसेल, तर विषय सुखाचा कौटुंबिक मर्यादेत उपयोग घेऊन हळूहळू त्या परम सत्याच्या जवळपास तरी पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खºया अर्थाने पारमार्थिक होणे होय; परंतु परमार्थाच्या नावाखाली आज प्रापंचिक माणसास ‘हीन’ ठरवून भोगासाठी भजने करणारी आणि संतसंगाचे महामेळावे घेणारी मंडळीच परमार्थाच्या क्षेत्रात विषयाचा धागडधिंंगा घालीत आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक