फरेदुन भुजवालाविपश्यना साधनेचे पुनरुत्थान होऊन ५० वर्षे झाली.़ तथागत गौतम बुुद्धांनी अथक परिश्रमाने शोधलेली ही विद्या पुन्हा भारतात आणून तिचा जगभरात प्रचार आणि प्रसार झाला़ या घटनेला मूर्तरूप देण्याचे काम केले ते विपश्यनाचार्य सयाजी उ बा खीन यांनी़ ब्रह्मदेशात ते ही विद्या शिकवायचे़ स्वत:ला विशेष रूपाने बघणे म्हणजे विपश्यना़ सरळ आणि सोपी पद्धत़ कोणतेही कर्मकांड नाही़ पूर्जा, अर्चा नाही़ ही विद्या शिकण्याचे कोणतेही शुल्क नाही. विपश्यना केंद्रात जाऊन ही विद्या शिकावी लागते़ या केंद्राचा कारभारदेखील दान मिळालेल्या पैशातून व सामग्रीतून चालतो़ अशा या शुद्ध धर्माच्या संपर्कात विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका आले़ मायग्रेनसारख्या व्याधीने ते त्रस्त होते़ गोएंका यांचा मित्र ऊ छां ठुन यांनी विपश्यना शिबिरात सहभागी होण्याचा सल्ला त्यांना दिला़ त्यावेळी त्रिपिटकाचे सहावे संगायन ब्रह्मदेशात होते़ तेव्हा सयाजी उ बा खिन यांच्यासोबत गोएंका यांची भेट झाली. ऊ छां ठुन यांनी तुमच्याविषयी सांगितले़ तुम्ही मायग्रेनवर उपचार करण्यासाठी
माझ्याकडे आला आहात़ पण मी असमर्थ आहे़ मी उपचार नाही करत पण. विपश्यना विद्या शिकवू शकतो़ ही अध्यात्माची विद्या आहे़ कोणत्याही आजारावर उपचार करण्यासाठी ही विद्या शिकवणे म्हणजे या विद्येचे अमूल्यन करणे आहे, असे उ बा खिन यांनी गोएंका यांना सांगितले़ मी आश्चर्यचकित झालो़ त्यांना ज्ञात होते की, मी प्रसिद्ध व्यक्ती आहे़ मला शिष्य करून कोणताही सांसारिक गुरू अभिमानाचा अनुभव करू शकला असता़ पण त्यांनी तसे केले नाही़ या एकाच गोष्टीने गोएंका त्यांच्याकडे आकर्षित झाले़ गोएंका विपश्यना शिबिरात सहभागी झाले़ या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाली़ गोएंका यांनी या उ बा खान यांच्याकडे या विद्येचा सखोल अभ्यास केला़ ब्रह्मदेशातून या विद्येचा भारतात प्रचार आणि प्रसार केला़ जगभरात विपश्यना अभ्यासाची २५० हून अधिक केंद्र आहेत़