आरोग्य बिघडवणारं अन्न सेवन तरी कसं करावं व दानही कसं करावं? दान केलं तरी ते उत्तम कसं असू शकेल? इंजेक्शन देऊन मोठं केलेलं टरबूज, पावडर टाकून पिकवलेली केळी व कलर दिलेले वाटाणे, आंबे, भेसळीचं तेल, निकस धान्य, केमिकलपासून तयार केलेलं दूध, फास्टफुड ढाब्याचं जेवण, हे उत्तम कसं? आज उत्तम अन्नदानच उत्तम असतं हे समजणं महत्त्वाचं आहे.
एका बाजूला अन्नाच्या अतिरेकाने अजिर्ण झाल्याने झोप नाही, दुसरीकडे पोटात अन्नाचा कण नाही म्हणून झोप येत नाही. आमच्या देशात कुपोषणाने मरणारे अनेक आहेत. अन्न वाया घालवणारे जास्त आहेत. अन्नाचं मोल कळावं म्हणूनच अन्नाला ‘अन्नब्रह्म’ म्हटलं आहे. स्वामी रस्त्याने चालत होते, हातात भिक्षा होती. भरधाव येणाऱ्या घोड्याचा धक्का लागला, अन्न जमिनीवर पडलं. स्वामींनी मातीवरचा एक एक कण उचलून घेतला. बा.भो. म्हणतात, तो मातीच्या कणाकणातून भिक्षेचे कण वेचत होता. कणाकणाने पूर्ण परंतु भक्तासाठी व्याकूळ होता. आपल्या परिवाराला स्वामी म्हणत, जेवढं अन्न लागेल तेवढंच मागत जा.
असं सांगतात, झोळी टाकल्यावर अन्नकण जमिनीवर पडले तेव्हा म्हणाले, ‘‘एैसे आणुआणु सांडावे ते काई तुमचे दाई’’ अन्नदात्याचं अन्न वाया घालवता ते तुमचे वैरी आहेत काय? शेजारचा उपाशी असेल तर तुम्हाला जेवणाचा अधिकार नाही ही महंमद पैगंबराने आपल्या अनुयायांना केलेली सूचना खरंच मोलाची आहे. गरज आहे तेथे उत्तम नक्कीच अन्नदान करा, पण फुकट मिळतं म्हणून कामचुकार व आळशी पोसू नका. गरजवंताने ते जरूर घ्यावं, पण आपल्यात बळ आल्यावर आपणही दान करावं, विंदांची कविता सुंदर आहे. ते म्हणतात,^‘‘देणाºयाने देत जावे, घेणाºयाने घेत जावे,कधी तरी घेणाºयाने देणाºयाचे हात घ्यावे’’बा.भो. शास्त्री