- शैलजा शेवडेश्रद्धस्व तात श्रद्धस्व नात्र मो$$२हं कुरु ष्व भो:।ज्ञानस्वरूपो भगवा-नात्मा त्वं प्रकृते: पर:॥(अष्टावक्र : महागीता)भावार्थ: हे प्रिय, या अनुभवावर श्रद्धा ठेव़ या अनुभवाच्या सत्यतेबद्दल मनात शंका आणू नकोस. तूच ज्ञानस्वरूप आहेस, प्रकृतीहून वेगळा आहेस. तू आत्मस्वरूप भगवान आहेस...! अशी श्रद्धा ठेव म्हटलं की, श्रद्धा ठेवता येते का? मुळात श्रद्धा म्हणजे नेमकी कुठली भावना. श्रद्धा म्हणजे जी असायला काही तर्क लागत नाही. जेव्हा व्यक्तीबद्दल ही भावना असते, तेव्हा तिला निष्ठा म्हणतो. भक्तीच्या क्षेत्रात असेल, तर ती श्रद्धा.श्रद्धा म्हणजे जे परमतत्त्व दिसत नाही, त्याला शोधायची हिंमत. जे अज्ञेय आहे, त्याला जाणण्याची हिंमत..! श्रद्धा म्हणजे सगळं जग म्हणत आहे, ईश्वर वगैरे काही नसतं. ही नुसती कल्पना आहे. पाखंड आहे, पण श्रद्धा म्हणते, मी शोधणार. श्रद्धा म्हणजे माझ्या अंतरी कोणीतरी सांगतंय ते परमतत्त्व आहे, नक्की आहे. ते शोधा म्हणजे सापडेल. श्रद्धा म्हणजे पाण्याची धार. ज्या अर्थी तहान आहे, त्या अर्थी पाणी असणारच, ही खात्री. जर माझ्या मनाला परमात्म्याची तहान लागली आहे, तर तहान भागविणारे निश्चित असणार ही खात्री...! श्रद्धा म्हणजे काहीतरी भव्य दिव्य आहे, ते शोधायची सुरु वात... जेव्हा आपले मन या साऱ्या विश्वाचा अभ्यास करू लागतं, सत्य, शाश्वत, आनंद असं काहीतरी आहे, याची जाणीव होऊ लागते आणि मग खात्री होते, तोच एकमेव सर्व जगताचा कर्ता, करविता आहे, याची पक्की खात्री पटते, ती श्रद्धा. कुठे आपल्यासारख्या सामान्य माणसाला आत्मा, परमात्मा वगैरे शब्द माहीत असतात, कुठे आपण ध्यान, समाधी वगैरे अवलंबत असतो, पण तरीही आपल्याला जाणवत असते ती श्रद्धा.. श्रद्धेची जबरदस्ती नाही करता येत! तो भाव सहजपणे निर्माण होतो. श्रद्धा ही अतिशय उच्च प्रकारची अनुभूती असते.
श्रद्धस्व तात श्रद्धस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:26 AM