कितीतरी प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी या धरतीमातेची चिरफाड केली जाते, या सर्वांना प्रेमाने सहन करून नेहमीच विशाल हृदयामध्ये आपल्या लेकरांना सामावून घेते. सर्वांची भूक भागविण्यासाठी उत्पादन करत राहते. सामावून घेणे आणि सहन करण्याची अफाट क्षमता या धारांमध्ये दिसते. आपण ही सहनशील बनून सर्वांना सामावून घेऊ या.
सागर : ‘जल हेच जीवन’ मानले जाते. जर मनुष्याच्या जीवनामध्ये पाण्याचा अभाव असेल, तर पूर्ण जीवन विस्कळीत होते. मनुष्य अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो, परंतु पाण्याशिवाय जगणे कठीण. जमिनीला सुपीक बनविण्यासाठीसुद्धा पाण्याची गरज लागते. शरीरामध्ये ७0 टक्केपेक्षा जास्त पाणी राहते. पाण्याची मात्रा कमी झाली की, शरीराच्या कार्यपद्धतीमध्ये बिघाड होतो. त्वचेवरही त्याचा परिणाम होतो. जल तत्त्व किती महत्त्वाचे आहे, हे तर आपण सर्व जाणतोच. पाणी शीतलतेचे प्रतीक आहे, पण पाणी जर उफाळून आले, तर सर्व सृष्टीला उद्ध्वस्त ही करू शकते. सृजन आणि संहार या दोन्ही गोष्टी दिसून येतात.
अग्नी : पवित्रतेचे प्रतीक आहे. अग्नीमध्ये वस्तूला परिवर्तन, तसेच पवित्र करण्याची शक्ती आहे. प्रत्येक शुभकार्यामध्ये अग्नीचे विशेष स्थान दिसून येते. जसे लोखंडाला अग्नीमध्ये टाकले, तर ते मोल्ड होऊ शकते, सोन्याला आगीत टाकले, तर त्याच्यातली खाद नष्ट होते. परिवर्तन करण्याची, स्वच्छ करण्याची क्षमता या अग्नी तत्त्वामध्ये आहे.
आकाश : विशालतेचे प्रतीक आहे. जेव्हा कधी आकाशाकडे लक्ष जाते, विचारांमध्ये विशालता येते. मन काही कारणाने संकुचित झाले असेल, ते विशाल बनविण्यास मदत मिळते.ब्रह्मकुमारी नीता