शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

झाली बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 5:47 AM

कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते.

- डॉ. गोविंद काळेगणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लवकर याया आबालवृद्धांच्या घोषणेने घाटावरची अनंत चतुर्दशी दुमदुमून जाते. कोकणातील/ गोव्यातील गणपती दीड-तीन-पाच-सात जसा मानून घेतलाय त्याप्रमाणे पूजला जातो. घराजवळच्या तळीवर विसर्जन होते. तळीवर जायचे तर वाट खाचखळग्याची, हातात विजेरी हवी आणि मुखी शब्द असतात ‘मार्गे हळूहळू चाला, मुखाने श्रीगजानन बोला’ असे म्हणत म्हणत गणेश विसर्जनासाठी वाड्यावरील मंडळी निघतात. गणेशाचे आगमन आणि बोळवण सर्वत्र अतीव उत्साहानेच होते. ‘बोळवण’ हा शब्द अनंत चतुर्दशीनंतर भेटतच नाही. तो दैनंदिन व्यवहारातून वर्षभरासाठी जणू हद्दपार झालेला असतो. बोळवण म्हणजे रवानगी, पाठवणी, विसर्जन.संसारातही केव्हा केव्हा बोळवण करण्याची पाळी येते. एखादा दूरस्थ पाहुणा मुक्कामाला येतो, परत जाण्याचे नाव घेत नाही. घरात कुजबूज सुरू होते की, आणखी किती दिवस राहणार? आम्ही तातडीच्या कामासाठी परगावी जाणार आहोत, असा सूर गृहलक्ष्मी लावते. पाहुण्याला जाणीव होते. तो आपला गाशा गुंडाळतो. घरातील सगळेच सुस्कारा सोडतात. शेजारचे नाना खोचकपणे विचारतात, पाहुणे गेले वाटते? बाबुराव उत्तरतात, शेवटी बोळवण करावी लागली. म्हणजे गोडीगुलाबीने, मोठ्या प्रेमाने रवानगी केली. येतात असे प्रसंग आयुष्यात.घरी आलेल्या पाहुण्यांची बोळवण करता येते. मंगलमूर्तीची बोळवण मोठ्या थाटामाटाने केली जाते. ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ हे आपले उगी उगी. ही सारी व्यावाहरिक गणिते. संत म्हणतात ‘बोळवण’ मी तू पणाची झाली पाहिजे.‘मी तू पणाची झाली बोळवणएका जनार्दनी श्री दत्त ध्यान’असे ध्यान लागते का? द्वैताची बोळवण झाली पाहिजे. अहंकाराची बोळवण केली पाहिजे. ही बोळवण आरतीमध्ये सुरेख म्हणता येते. प्रत्यक्षात काय? गणित अवघड आहे. अशी गणिते सुटता सुटत नाहीत. ‘हरपले मन, झाले उन्मन’ मनरहित अवस्थेत जगता येणे शक्य होईल का? आहे ना अध्यात्म अवघड? जे अवघड आहे ते आपणच सोपे करायचे असते. त्याला शॉर्टकट नाही. तुकोबांच्या भाषेत सांगायचे तर।। कागदी लिहिली नावाची साखर, चाटिता मधुर केवी लागे।।भगवान श्री रमण महर्षींच्याकडे दर्शनासाठी आलेल्या पाश्चात्य विद्वान भक्ताने ‘माझे मन ध्यानात न लागता सदैव भटकत राहते’ असा प्रश्न केला तेव्हा महर्षी उत्तरले, जीवनातील नानात्व हे निश्चय करायला देत नाही. हे सरळ आहे. म्हणून अवघडही आहे. मी तू पणाची बोळवण हाच उतारा त्यावर आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक