- शैलजा शेवडे
दिवसरात्रही, सांजपहाट, शिशिरामागून, पुन्हा वसंत, काळ सरकतो, आयुस नेतो, तरीही आशा, कोण त्यागतो,भज गोविंद, भज गोविंद, भज गोविंद मूढ मना,घोकंपट्टी व्याकरणाची, नाही रोखती मृत्युखुणा।एकदा आदी शंकराचार्य वाराणसीमध्ये आपल्या शिष्यांसह चालले असताना त्यांना एका झोपडीमधून पाणिनीय व्याकरणाचे सूत्र एका वृद्धाकडून ऐकावयास आले. आचार्य त्याला उद्देशून म्हणाले, ‘हे वृद्ध माणसा ! आपण वृद्धावस्थेत पदार्पण केले आहे. शरीर गलितगात्र झाले आहे. केव्हाही मृत्यू झडप घालेल, अशी अवस्था आहे. अशा वेळी पाठांतराचा काही उपयोग होणार नाही. गोविंदाला भजा.हे मूढ जीवा, गोविंदाला भज...गोविंदाला भज...असे त्यांनी चर्पटपंजरिका स्तोत्रातून सांगितले आहे. त्याचा मी केलेला अनुवाद..गलितगात्र अन् मानही हलते, दाताविण ते तोंड बोळके,डुगडुगणाऱ्या हाती काठी, किती ओढ ती जगण्यासाठी।....भज गोविंद, भज गोविंदबाळपणी तू, खेळी रमसी, तरुणपणी तरुणीत गुंतसी,वृद्धपणी अन् चिंता करसी, परमात्म्याला, कधी न स्मरसी। भज गोविंद, भज गोविंदहे मना,'कमलदली जलथेंब क्षणभरी, जीवन अपुले, क्षणभंगुरी'...जीवनाची क्षणभंगुरता जाण...आणि परमेश्वराचे चिंतन कर...आदी शंकराचार्य सांगतात,सत्संगातून नि:संगत्व, नि:संगातून निमोर्हित्व,निमोर्हातून निश्चलचित्त, निश्चलचित्ते जीवनमुक्त ।योगामध्ये, भोगामध्ये, लोकांमध्ये वा एकांती,ब्रह्मचिंतने चित्त रंगले, आनंदी आनंद किती।।