शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 8:54 PM

रेडिओवर छान गाणं लागलं होतं, हँसते हँसते कट जाये रस्ते-जिंदगी यूँ ही चलती रहे. मीही गुणगुणत प्रसन्न होऊन गेलो. खरोखर लोक आज नैसर्गिक हास्य विसरले आहेत...

- डॉ. दत्ता कोहिनकर

डोंट वरी, बी हॅपी हे हॅपी नावाचं औषध शोधण्यासाठी लोक जगभर फिरतात. खरंतर ते आपल्या मनातच असतं. नव्वद टक्के आजार मानसिक असतात. नकारात्मक विचार हे त्याचं मूळ असतं. एक राक्षस लोकांना  छळायचा. एकदा डेव्हिड हा पोरगेलासा मेंढपाळ त्या खेड्यातील नातेवाइकांना भेटायला आला. त्यानं विचारलं, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त गावकरी म्हणाले, खूपच मोठ्या आकाराचा आणि बलाढ्य आहे तो. यावर डेव्हिड म्हणाला,खूप मोठ्या आकारमानामुळे नेम धरण्याची आवश्यकता नाही. कसेही दगड, विटा, सळया भिरकावल्या, तरी त्याला लागतीलच.गावकऱ्यांनी दगडफेक, भालाफेक करून राक्षसाला ठार मारले. राक्षसाच्या प्रचंड आकारमानाकडे डेव्हिड वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात होता, म्हणून त्या संकटाचं निराकरण झालं.यशस्वी व्हायचं असेल, तर विचारांच्या सकारात्मकतेची प्रचंड गरज असते, असे विख्यात मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांनी म्हटले आहे. सकारात्मक व नकारात्मक हे दोन्ही विचार संसर्गजन्य आहेत. या विचारांचा आपल्यावर व आपल्या सहवासात येणा?्यांवर परिणाम होतो. सकारात्मक माणसाभोवती विशिष्ट वलय निर्माण होत असल्यामुळे ते इतरांना आकर्षित करतात. असा माणूस आनंदी, प्रसन्न असतो. आपण स्वत:शी काय बोलतो यावर आपले भवितव्य अवलंबून असते, त्यालाच ' सेल्फ टॉक'  म्हणतात. नकारात्मक विचार करणाऱ्याच्या आयुष्यात नेहमी दु:ख व नैराश्यच येते, म्हणून नेहमी स्वत:बद्दल सकारात्मक बोला. सकारात्मक विचार करणारा माणूस बंद घड्याळाकडेही दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवणारे घड्याळ या दृष्टिकोनातून पाहतो. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश ही यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचार करणाऱ्याला तेच अपयश मार्गातील अडथळा वाटतो. डॉ. जॉईस ब्रदर्स म्हणतात, की यश ही मानसिक स्थिती आहे. तुम्हाला यश हवं असेल, तर तुम्ही यशस्वी झाला आहात असा विचार करा. सकारात्मक विचारसरणी ही उज्ज्वल भवितव्याचा दाखला असतो. आनंदी  माणूस हा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आनंदी नसतो, तर स्वत:ची विशिष्ट मनोवृत्ती, विचारांमुळे आनंदी असतो. मन सकारात्मक व निर्मल करण्यासाठी रोज सकाळी - संध्याकाळी १० ते १५ मिनिटे मांडी घालून ध्यान करा. आपल्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा, म्हणजेच डोळे बंद करून त्याला जाणत राहा; त्याला कुठलाही अंक, मंत्र न जोडता नैसर्गिक श्वासाला जाणता-जाणता मन एकाग्र व शुद्ध करा. सकारात्मक विचार प्रबळ करण्यासाठी व नकारात्मकता धुवून काढण्यासाठी एवढंच म्हणा- 'येरे घना येरे घना ,न्हाऊ घाल माझ्या मना' यासाठी रोज ध्यान कर 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकMeditationसाधना