जीवनात चारित्र्य घडवायला, यमनियमांप्रमाणे वागायला, लागलो की, जीवन सुखद आणि समृध्द होते. याउलट दुसºयांचे अहीत चिंतल्यास मनुष्य कदापीही ुसुखी राहू शकत नाही. दुसºयाला दु:ख देणाºयाला वाईट परिणाम भोगावे लागतात. मानवी जीवनात वाईट परिणाम भोगावे लागतात. जीवनात वाईट आणि पुन्हा ते परिणाम भोगावे लागू नयेत. या आध्यात्मिक मार्गाच्या पायाशिवाय या मार्गावर प्रगति होणे, फळ मिळणे शक्य नाही. प्रत्येकाला बरेच स्वभावगुण असतात. स्वभावगुण ही एक सवय, एक सामान्य विचार करण्याची, बोलायची, वागायची पद्धत. बहुतेक सर्वांना या उत्कृष्ट (उत्साही, नियमीत,विश्वसनीय, दयाळु, प्रांजळ) आणि निकृष्ट गुणांचे मिश्रण असते. उत्तम चारित्र्य हे मानवी जीवनात सर्वोकृष्ट आभूषण मानले गेले असून, चारित्र्य म्हणजे नेमके काय आहे? चारित्र्य हे प्रत्येकाच्या आपल्या मानसिक आणि नैतिक गुणांचा विशेष वैयक्तिक संचय आहे. अध्यात्म मार्गावर चिकाटीने प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी संतुष्ट वृत्ती कायम करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित केलाच पाहिजे. त्यामुळे मनुष्याने मानवी जीवनात इतरांना न दुखविण्यासाठी तसेच सत्यवचनी असण्याचा प्रयत्न केला पाहीजे. जीवनात ‘सत्यानंद ध्यानामुळे प्राप्त होतो हे सत्य आहे, आणि उच्च स्तरांवरील चैतन्य हा मानवाचा वारसा आहे हे ही सत्य आहे. तथापि, दहा यम आणि त्यांना अनुसरून दहा नियम यांची आपल्या सत्यानंदाची चेतना कायम राखण्यासाठी आवश्यकता आहे. त्याचप्रमाण? कुठल्याही जन्मांत आपल्या स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल उत्तम भावना असणेही आवश्यक आहे. हे यम आणि नियम आपले चारित्र्य घडवतात. चारित्र्य हे आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. त्यामुळेच जेवढे आपण उच्च स्तरावर पोहोचू, तेवढेच आपण अधोगतीला जाणे शक्य आहे. आपल्या शरीरांतील वरची चक्रे गतीने फिरत असतात, तर खालची चक्रे अधिक गतीने भ्रमण करीत असतात.
आपण जे चारित्र्य घेऊन जन्माला येतो ते आपल्या पूर्वजन्मांच्या सर्व कर्मांचे फळ आहे. काही लोक जन्मत:च स्पष्टपणे धार्मिक असतात, काही मिश्र स्वभावाचे असतात, तर इतर काही स्वार्थी आणि धूर्त असतात. तथापि, धर्म हे ही शिकवतो की आपण आपले जन्मत: असलेले गुण आपल्या स्वयंचिंतनाने आणि स्वप्रयत्नाने, आपण कसे विचार करतो आणि कसे वागतो यांचे स्वयं अवलोकन करून आणि त्यांवर नियंत्रण करून बदलू शकतो. आपल्या ज्या गुणाची वृद्धी करण्याची आकांक्षा आहे त्या गुणाबद्दल चिंतन केले आणि तो गुण प्रदर्शित केला तर तो गुण अधिक दृढ होईल.त्यामुळे ज्या कायार्मुळे हा गुण वृद्धित होईल अशी कार्ये नियमीत करण्याची सवय करा. त्यापासून होणाºया फायद्यांचे व्यवस्थित अवलोकन करा. आपला उद्देश वास्तवतेला धरून ठरवा. आपला उद्देश एवढा कठीण ठेवू नका, जेणेकरून तुम्ही तो पूर्णपणे साध्य करु शकणार नाही आणि त्यामुळे निराश होऊन तुम्ही प्रयत्न करणे सोडून द्याल. आपला कष्टाळूपणा वाढविण्यासाठी आपली कार्यक्षमता रोज पांच टक्के वाढवण्यावर आपले लक्ष्य केंद्रित करा. ते कार्य झपाट्याने करून, जास्त वेळ काम करून किंवा या दोहोंच्या मिश्र वापराने प्राप्त करता येते. हळुहळु, चारित्र्यात बदल होईल आणि तुम्हाला निर्देशित करणारे लक्षणांचे परिवर्तन होईल. तुमच्या जीवनाला त्याने गाढ आध्यात्मिकता येईल आणि तुमचे भौतिक जीवन अधिक सुरक्षित होईल.
- वेदातांचार्य श्री राधेराधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा.