शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

भक्ती म्हणजे अंतरंगात बदल होणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 4:38 PM

संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला.

- भरतबुवा रामदासी

महाराष्ट्रातील संतांनी भक्तीमार्गाचा प्रचार आणि प्रसार करतांना देवळातला देव विश्वात्मक बनविला. विश्वात्मक देवाचे वर्णन वेदांमध्ये आहेच पण वेद हे संस्कृत भाषेत आहेत. शिवाय वेदभाषा ही बहुजन समाज कळणारी नाही. त्या काळात वेदमंत्राचा अधिकार देखील सर्वांना नव्हता. त्यामुळे वेद तत्वज्ञानापासून बहुजन समाज वंचित राहिला. संतांनी विचार केला की, मनुष्य देहाच्या उद्धाराचे हे तत्वज्ञान समाजाला कळलेच पाहिजे. वेदाच्या कृपणतेबद्दल संतांनी खंत व्यक्त केली, ज्ञानराज माऊली म्हणतात -

वेद संपन्न होय ठाई । परी कृपणू आण नाही ॥जो कानी लागला तिही । वर्णाचिया ॥

वेदातला उध्दाराचा हा मार्ग, हा मानवता धर्म, सर्वांना कळावा, मोक्षद्वार सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून संतांनी वेद वाङमय मराठी मायबोलीत आणले. वेदाचे काठिण्य लक्षात घेऊन भगवंताने श्रीकृष्ण अवतारात गीता सांगितली पण अशिक्षित समाजाला गीता देखील कळाली नाही परत भगवंताने ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेऊन ज्ञानेश्वरीसारखा सुबोध ग्रंथ रचला व वेदप्रणति मानवता धर्म तत्वज्ञान बहुजन समाजासाठी खुले केले.माऊली म्हणतात -

तैसा वाग्विलासे विस्तारु  । गीतार्थेसी विश्व भरु  ॥आनंदाचे आवारु  । मांडू जगा ॥

संतांनी कर्मकांडात आणि  व्रतवैकल्यांत अडकलेली भक्ती सर्वजनसुलभ केली. देव प्राप्तीसाठी फार सायास करण्याची गरज नाही. पश्चातापपूर्वक भगवंताला शरण गेले की तो सहज प्राप्त होतो. यासाठी संतांनी नामसाधना सांगितली. माऊली हरिपाठात वर्णन करतात -

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥ 

संताच्या या सोप्या, सुलभ तत्वज्ञानामुळे या देशातील अठरा पगड जाती हरिनामाच्या ध्वजाखाली एकत्रित आल्या व त्यांनी पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा गोपाळकाला केला. पंढरीचा पांडुरंग हा भेदभावातीत आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, पतितपावन आहे, त्याला सर्वभावे शरण जा. मन, बुद्धी, चित्त व संसारातील सर्व कर्म त्याला अर्पण करा. जे जे कर्म कराल ते निष्काम व निर्लेप करा. कुणाचा कधी द्वेष, मत्सर, वैरभाव करू नका. देव हा देवळापुरता मर्यादित नाही, तो सर्वांतरयामि आहे, सर्वत्र आहे.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥हा भक्तीयोग निश्चित । जाण माझा ॥ 

ही भक्ती जणमनात रुजविली अशा अभेद वृत्तीने जर जीवन व्यवहार केला तर परमेश्वराचे सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भक्ती म्हणजे नुसतेच बाह्य दर्शन नाही तर अंतरंगात बदल अपेक्षित आहे.

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी - 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक