सर्वांचा आवडता आणि सर्वांनाच हवा असणारा दिवाळी सण यंदा ७ नोव्हेंबर साजरी केली जाणार आहे. ७ तारखेला लक्ष्मीपूनज केलं जाईल. पण त्याआधी ५ तारखेला धनत्रयोदशी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा केली जाते.
काही मान्यतांनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास जीवनात सुखसमृद्धी येते. या दिवशी लोक भांडी आणि दागिण्यांती खरेदी करतात. यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेसाठी १ तास ५५ मिनिटांचा कालावधी असेल. चला जाणून घेऊ या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त...
शुभ मुहूर्त
५ नोव्हेंबर २०१८ ला धनत्रयोदशी साजरी केली जाणार. या दिवशी पूजेसाठी सायंकाळी ६.०५ वाजेपासून ते ८.०१ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असेल. शुभ मुहूर्ताचा कालावधी १ तास ५५ मिनिटांचा असेल. तर या दिवशी खरेदी करण्याचा मुहूर्त सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत, दुपारी १ वाजेपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ७ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.
चांदी खरेदी करणे शुभ
धनत्रयोदशीच्या दिवशी लोक घरातील भांडी खरेदी करतात. तसे या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण चांदीला चंद्राचे प्रतिक मानले जाते. आणि चंद्र हा शीतलतेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे चांदी खरेदी केल्याने मनात समाधान राहतं. ज्यांच्याकडे समाधान आनंद आहे, ते स्वास्थ्य, सुखी आणि धनवान राहतात.