सध्या दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हणजे, दिव्यांचा सण. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळी 27 ऑक्टोबरपासून साजरी करण्यात येणार आहे. 27 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. पण त्याआधी दोन दिवस म्हणजेच, 25 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे. असं सांगितलं जातं की, या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता. यादिवशी मोठ्या भक्तीभावाने देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा करण्यात येते.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास जीवनात सुखसमृद्धी येते, अशी मान्यता आहे. यादिवशी लोक भांडी आणि दागिण्यांची खरेदी केली जाते.
शुभ मुहूर्त
यंदा धनत्रयोदशीची तिथी दोन दिवस असून अनेकांना प्रश्न पडला आहे की, नक्की कोणत्या दिवशी आणि वेळी पूजा करावी. यावर्षी तिथीची सुरुवात 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी होते. जी पुढच्या दिवशी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी संपते.
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटांपासून ते सकाळी 8 वाजून 15 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
चांदी खरेदी करणे शुभ
धनत्रयोदशीच्या दिवशी लोक घरातील भांडी खरेदी करतात. तसेच या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण चांदीला चंद्राचे प्रतिक मानले जाते. आणि चंद्र हा शीतलतेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे चांदी खरेदी केल्याने मनात समाधान राहतं. ज्यांच्याकडे समाधान आनंद आहे, ते स्वास्थ्य, सुखी आणि धनवान राहतात, असं मानलं जातं.