अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. असं म्हणतात की अक्षय तृतीये दिवशी केलेलं कोणतही काम फलदायी असतं. तसंच या दिवशी केलेलं काम हे पूर्णच होतं. या दिवशी लोकं काहीना काहीतरी शुभकार्य करण्यावर भर देतात. तसंच या दिवशी भगवान परशुराम यांचाही जन्मदिवस असतो. त्यामुळे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कोणते काम करणं शुभ?या दिवशी खरंतर कोणतेही शुभ कार्य केलं जाऊ शकते पण गोमातेची सेवा करणे हे या दिवसाचे अत्यंत मोठे शुभकार्य असते असे म्हटलं जातं. हिंदू मान्यतेनुसार गायीला गोमाता म्हटलं जातं. तिची सेवा करणं मोठं पुण्यकार्य समजलं जातं. त्यामुळेच अनेकजण अक्षयतृतीयेच्या दिवशी गायीची सेवा करतात. असं म्हणतात की या दिवशी गायीला पीठामध्ये गुळ घालून खायला देणे हे अत्यंत उत्तम कार्य आहे.
याचे फायदे काय आहेत ते पाहूअशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतोगोमातेची सेवा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. गायीला रोज भोजन दिल्याने अशुभ ग्रहही शुभ होतात.
पितृदोषांपासून मुक्तीज्योतिषांच्या मान्यतेनुसार गोमातेची सेवा केल्याने पितृदोषही दूर होतात. म्हणून गोमातेची सेवा करणं हे फार पुण्यवान कार्य समजलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृंसबंधीत कार्यही केले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेला पितृंसबंधीत कार्य झाल्यानंतर गायीला भोजन देणे हे पुण्यकार्य समजले जाते.
(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच यातील कार्य करावे)