शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

पितृदोष घालवण्यासाठी हे जरूर करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 9:45 AM

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत.

ज्या पूर्वजांनी अपार कष्ट सोसून आपल्याला जन्म दिला, लहानाचे मोठे केले, कष्ट सोसून सर्व सुख उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याऋणातून तर आपण उतराई होऊ शकत नाहीत. परंतु फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांचे स्मरण करावे, त्यांच्या नावाने तिलोदक सोडावे, पिंडदान करावे, असे आपल्या संस्कृतीत सांगितलेले आहे. परंतु जे लोक हे करीत नाहीत, त्यांचे काय, असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. तर जे लोक असे करीत नाहीत, त्यांना पितृदोष लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर, नोकरी, व्यवसाय आदी कामांमध्ये अडचणींचा डोंगर उभा राहतो. साधे, सोपे, सरळ काम पण तेही होत नाही. या बाबींमुळे ते त्रस्त होतात. हा दोष दूर करण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या नावाने काही नाकाही करणे क्रमप्राप्त ठरते.

एखाद्याला पितृदोष आहे की नाही, हे पाहण्यासाठी कुंडली लागते. परंतु कुंडली, पत्रिका नसेल तर पितृदोषाने आपण त्रस्त आहोत, हे कसे ओळखावे, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. पितृदोषाने घरात कोणत्या घटना घडतात ते थोडक्यात पाहू-

१) वडील व मुलगा यांच्यात खटके उडणे. त्यांच्यात मतभेद असणे. विचार बिल्कुलच न जमणे.

२)  अपत्यांचे विवाह जुळण्यात बाधा उत्पन्न होणे. तसेच जुळलेले लग्न मोडणे. कुंडली जुळत असेल तरी काही ना काही कारणास्तव विवाह न जुळणे.

३) विवाह होऊन अनेक वर्षे झाली तरी अपत्यप्राप्ती न होणे. गर्भपात होणे. अपंग मुले जन्माला येणे.

४) कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे.

५) कर्ज वाढणे. व्यापार-व्यवसायात नुकसान होणे. परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती खुंटणे.

६) कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणे. अन्न- धान्याची बरकत नसणे. वायफळ खर्च होणे.

७) वाईट स्वप्न पडणे. वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राध्दपक्षात ब्राह्मण, पंडीत यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. ज्या माणसाच्या घरात भागवत ग्रंथ जेवढा काळ राहील तोपर्यंत त्याचे पूर्वज-पितर दूध, तूप व मधुयुक्त अन्नसेवन करतात व जलप्राशन करतात. भगवान श्रीकृष्णाने आपले सर्व तेज ज्या भागवत ग्रंथात ठेवले तो ग्रंथ म्हणजेच श्रीमद्भागवत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात श्रीकृष्णाची अक्षरबद्ध प्रतिमाच. गोकर्णाने आपल्या सावत्र भावाची पिशाच्चमुक्ती होण्यासाठी श्राद्ध केले. भागवत सप्ताह केला. तेव्हा कोठे तो उच्च लोकी गेला. भागवताच्यापठण/श्रवणाने पितर संतुष्ट होऊन सद्गतीस जातात. श्रद्धेने श्राद्ध केल्यास कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळते. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने श्राद्ध करावे.

पितृदोषावर हे आहेत उपाय-

१)  पिंडदान : नित्य मासिक, त्रैमासिक, षष्मासिक, सांवत्सरिक पिंडदान करावे.

२) जलतर्पण- नरकयातना सहन करणाºया पितरांचा जलतर्पणामुळे उद्धार होतो. देवतर्पण करताना बोटांच्या पुढच्या भागाकडून जल सोडावे. गुरू, ऋषी यांना रविचे बोट (अनामिका) व करंगळी यांच्या मुळातून जलतर्पण करावे. गुरुचे बोट (तर्जनी) व अंगठा यांच्यावरून पितरांना तर्पण करावे.

३) विविध प्रकारची दाने द्यावीत - गाय, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, रुपे, गूळ, मीठ ही दशदाने गरजूंना/सत्पात्रीस द्याव्यात.अष्टदाने- शिधा, जलाने भरलेला कुंभ, गाय, वस्त्र, भूमी, शय्या, छत्र, आसन गरजूंना दान द्यावे. उपदाने- अन्न, जलकुंभ, चामडी पादत्राणे, कमंडलू,छत्र, वस्त्र, काठी, लोखंडाचा मोठा दंड, शेगडी, दिवा, तीळ, विडा, चंदन, फुलमाला. पडदाने- आसन, चामडी जोडे, छत्र किंवा छत्री, अंगठी, कमंडलू,जानवे, तूप, वस्त्र, भोजन, भोजन बनविण्यासाठी भांडी इत्यादी दान करा.

४) आपल्या मात्यापित्यांची मनोभावे सेवा करावी.

५) विधिवत श्रेष्ठतेने हवनविधी करावा. हवनविधीच्या वेळी पितरांना आपण जे द्रव्य देतो त्याला कव्य म्हणतात. हवनाच्या सांगतेवेळी पितर आपली समस्याव प्रार्थना स्वीकारतात. अशाप्रकारे अग्नीच्या माध्यमातून यमासहित आपले सर्व ज्ञात-अज्ञात पितर तृप्त होऊन पुढील सद्गतीस मार्गस्थ होतात.

६) हवनयुक्त पितृसुक्ताचे पठण करणे.

- संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक