- प्रल्हाद वामनराव पैबालमित्रांनो, आपण मागच्या लेखात आईवडील हेच आपले खरे देव कसे ते पाहिलं. कारण देतो तो देव हे त्यामागचं अगदी साधं आणि सोपं गणित. जसे आपले आईवडील आपले देव आहेत, तसंच आणखी कोण कोण आपले देव हे आपण पाहणार आहोत. आईवडिलांप्रमाणे आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करणारे आपले शिक्षक अथवा तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमचे टीचर्सदेखील तुमचे खरे देव आहेत बरं का. कारण आज तुम्ही जे काही आहात ते तुमच्या या टीचर्समुळेच. मग तुम्हाला अगदी एबीसीडी शिकवणाऱ्या तुमच्या टीचर्सपासून ते अगदी तुम्ही मोठे झाल्यावर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सगळं काही मार्गदर्शन करणारे सारे टीचर्स तुमचे देवच. म्हणूनच दररोज तुमच्या शिक्षकांना मनातल्या मनात थँक्स म्हणायला मुळीच विसरू नका. मग करणार ना तुमच्या सर्व टीचर्ससाठी कृतज्ञता व्यक्त. आपले शिक्षक आपले देव कसे हे पाहिलं. पण ज्ञान देऊन तुम्हाला समृद्ध करणाºया टीचर्सप्रमाणे आणखी एक तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का? बघा बरं... तुम्ही कुठे राहता, तुमची ओळख नेमकी कोणामुळे आहे, तुम्ही ज्या राष्टÑात राहता ते राष्टÑ तुम्हाला नागरिकत्व देतं. तुम्ही ज्या राष्टÑात जन्माला येता त्या राष्टÑावरून तुमची ओळख ठरते. म्हणूनच आपला भारत देश हा तुमचा देव आहे. राष्टÑ हा जर देव असेल तर या राष्टÑाची भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तुम्ही सर्व मुलं भारतीय आहात, कारण तुम्ही भारतात जन्मला आहात. राष्टÑाची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या राष्टÑात राहणारी माणसं प्रगतिपथावर जातात. तुम्ही विद्यार्थी आपल्या भारताचे उद्याचे नागरिक आहात. म्हणूनच आपल्या भारताविषयी आपल्या मनात सतत कृतज्ञ असायला हवं. शिवाय एक उत्तम नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्याबाबत नेहमी जागरूक असायला हवं. राष्टÑाबाबत कोणती कर्तव्ये तुम्ही पाळायला हवीत हे आपण पुढील लेखात पाहू या.
तुमच्या आयुष्यातील खरा देव तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 4:53 AM