शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

स्वयं दास्य तपस्वीनाम्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 4:30 AM

जो करतो तो तपस्वी असतो. तपस्वी हा शब्द गुणवाचक आहे. कुणीही तपस्वी होऊ शकतो. तिथं जातीपातीचं बंधन नाही. तप हे कष्टसाध्य आहे.

- बा. भो. शास्त्रीएका बाईने स्वत:ची वाटी दुसऱ्या बाईला धुण्यासाठी दिली. ते श्रीचक्रधरांना रुचलं नाही. तेव्हा या सूत्राचा त्यांनी पुनरोच्चार केला व आपलं काम आपणच करण्याचा सल्ला दिला. जो करतो तो तपस्वी असतो. तपस्वी हा शब्द गुणवाचक आहे. कुणीही तपस्वी होऊ शकतो. तिथं जातीपातीचं बंधन नाही. तप हे कष्टसाध्य आहे. तप व तपश्चर्या हे शब्द अलीकडे कालबाह्य झाल्यासारखे वाटतात. चंगळवादात त्या शब्दांना स्थान नाही. याला कारण तसे आदर्श तपस्वी दिसत नसतील किंवा मनात भरत नाही. काहींच्या प्रमादामुळे विश्वासच राहिला नसेल, असंही असू शकतं. पण त्यात त्या शब्दांचा दोष नाही. अंधाºया खोलीत सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर सूर्याचा दोष नाही. बहिºयाला संगीत ऐकू येत नाही, म्हणून त्याचं मूल्य कमी होत नाही. तप म्हणजे काय? स्वत:ला तापवून घेणे. विटेचा भेंडा कच्चा असतो, गरम भट्टीत भाजला की पक्का होतो. भाकर भाजावी लागते. डाळ शिजावी लागते. अग्नी हा निर्दोष आहे. तो दोषांना जाळतो. कच्चेपण जाळून पक्कं करतो. रामायणात रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. आजही आपण सोन्याची परीक्षा आगीत टाकूनच घेत असतो. तप्त होताच ते उजळतं, तेजाळतं.भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,आगमापाययिनोनित्यास्तांस्तितिक्षस्व भारतसुखाचा अव्हेर व दु:ख सहन करण्याचा सल्ला भगवंत देतात. अर्जुन संतापरहित होऊन लढतो. म्हणून देव त्याला परंतप हे विशेषण लावतात. हीच तपश्चर्या आहे, ती घरात जनकाने, रस्त्यावर गाडगेबाबांनी केली. तप संतापाला सहन करतो तोच तपस्वी असतो. यश मिळवणारा यशस्वी, तर जो तप साधतो तो तपस्वी आहे. सूर्य तपतो म्हणून तेज आहे, चमक आहे ती कुणाला नको? सगळ्यांनाच हवी, पण स्वत:ची असावी.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक