शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

फक्त वैतागू नका, थोडा धीर धरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:54 AM

सध्या संक्रमण रोखणे, जीव वाचविणे सर्वात महत्त्वाचे आहे. ही काही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती नाही.

सध्या संक्रमण रोखणे, जीव वाचविणे सर्वात महत्त्वाचे आहे. ही काही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती नाही. पण त्यासाठी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. तुमच्या मनात त्याचे नकारात्मक चित्र बनवू नका. तीन आठवड्यांच्या सुटीनंतर नव्या ऊर्जेने कामाला लागा. सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व ओळखा. काही दिवसांनी हळूहळू सर्व रुळावर येईल. फक्त वैतागू नका. थोडा धीर धरा.

कोरोनामुळे जगभरात अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्सही बाधीत झाले. आजूबाजूला जे घडतेय ते सहन न झाल्यामुळे जर्मनीमध्ये एका वित्तमंत्र्यांनी आत्महत्या केली. हे नकारात्मक चित्र आहे. जग पुष्कळ हळुवार शांत झाले आहे. सर्व यंत्रे बंद आहेत. पण मला खात्री आहे की इतर सर्व प्राणी खूप खुश आहेत. अनेक ठिकाणी जंगली जनावरे रस्त्यावर येत आहेत. त्यांना वाटायला लागले आहे की, मानवी व्हायरस गेलेला दिसतोय.

असे म्हणून मी माझ्या लोकांचे दु:ख कमी लेखत नाही. पण जेव्हा कुठलीही संचारबंदी नव्हती तेव्हा असे नव्हते की लोक दु:ख भोगत नव्हते. प्रत्येक चार मिनिटाला रस्त्यावर कोणाला तरी फॅक्चर व्हायचे. कुणाचे तरी हाड तुटायचे. प्रत्येक बारा मिनिटांनी कुणाला तरी हात किंवा पाय गमवावा लागत होता. आता कुणालाही हात-पाय गमवावे लागलेले नाहीत. मला खात्री आहे की, फॅक्चर झालेल्यांची संख्याही अगदी कमी झालेली असेल. कारण पूर्वी कधीच मानवी इतिहासात इतकी हाडे तुटली नसतील जितकी विसाव्या आणि एकविसाव्या शतकात तुटली आहेत. याचे साधे कारण म्हणजे आपण आपले शरीर ज्या वेगाने जाण्यासाठी रचले गेले आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने धावतोय.सध्या अनेक जणांसोबत फक्त एवढेच घडतेय की, जेव्हा ते कामाला जात होते तेव्हा ते रोजच वैतागत होते. म्हणायचे की, हे कामाच्या ताणामुळे होतेय. बॉस किती भयंकर आहे, ट्रॅफिक किती वाईट आहे वगैरे. आम्ही त्या सर्व वाईट गोष्टी काढून टाकल्या. आता तुम्ही तुमच्या घरी, होम स्वीट होममध्ये आहात. पण आता लोक म्हणू लागलेत की, आम्हाला बाहेर पडायचे आहे.लोक वाईट वेळ आलीय, असे बोलत आहेत. प्रत्यक्षात अनिश्चितता हे जीवनाचे स्वरूप आहे. जीवनाच्या अनिश्चिततेबरोबर ताल धरून कसे नाचायचे ते तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही कधीच आनंदी आणि उल्हसित जीवन जगू शकणार नाही. जेव्हा तुम्ही ५-६ वर्षांचे होता तेव्हा ते नक्कीच आनंदी आणि उल्हसित जीवन होते. हळूहळू तुमच्या शरीरात ताठरता येऊ लागली. तुमचा जिवंतपणा कमी होऊ लागला आहे. तो वय झालेय म्हणून नाही तर तुम्ही जीवनात निश्चितता आणण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून. जेव्हा की, जीवनाचा स्वभावच अनिश्चितता आहे.खूप सारे लोक माझ्याकडे येतात, त्यांची एकच विनंती असते, सदगुरू आम्हाला आशीर्वाद द्या की, आम्हाला काहीच होऊ नये. अरे, हा कुठल्या प्रकारचा आशीर्वाद मागताय, हा मृत्यूसाठीचा आशीर्वाद आहे. फक्तमृत्यूमुळे काही होणार नाही. पण जर तुम्ही जिवंत असाल तर पुष्कळ काही होऊ शकते. माझा तुम्हाला आशीर्वाद असा आहे की, जीवन म्हणून जे काही आहे ते सर्व तुमच्यासोबत घडू दे, कारण ते जर आता घडले नाही तर कधी घडणार? खरे तर हेच जीवन आहे आणि ते सकारात्मकपणे जगायला हवे.तुम्ही जे काही करता ते पूर्णपणे सहभागाने आणि स्वेच्छेने केले तर हा तुमचा स्वत:चा स्वर्ग आहे. जर तुम्ही ते नावडीने केले तर नक्कीच नरकाप्रमाणे भासेल. ज्यांना लॉकडाऊन, संचारबंदीचे दु:ख होतेय त्यांनी हे मुद्दे लक्षात घ्यायला हवे. पण सध्या तरी त्यांना घरात राहण्याचा, त्यांच्या प्रिय व्यक्तींचाच त्रास होतोय. याआधी नेहमी ते याच प्रिय व्यक्तींबाबत बोलत होते, पण आता ते होम स्वीट होममध्ये वैतागले आहेत. यापूर्वी ते सतत व्यस्त होते, त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे.आता तुम्ही जे दु:ख भोगताय ते बऱ्याच अंशी तुमचे मानसिक नाटक आहे. तुम्हाला फक्त एक चांगला दिग्दर्शक होण्याची गरज आहे. जगाचे नाटक कदाचित तुम्हाला हवे तसे घडणार नाही, ते तुमच्यापेक्षा खूप मोठे आहे. पण किमान तुमच्या डोक्यात जे घडतेय ते तुम्हाला हवे तसे आणि त्याहीपेक्षा सकारात्मक घडायला हवे. ही वेळ आहे त्याला ताब्यात घेण्याची.जर तुम्ही या तीन आठवड्यांबद्दल रडारड केली तर पुढची तीन वर्षे तुम्ही शनिवार, रविवार सुट्टी न घेता काम करायला हवे. कारण मला वाटते की, तुम्हाला तुमचे काम एवढे आवडत आहे, एकतर हे किंवा ते. दोन्हींचा तुम्हाला त्रास होत असेल तर काय करायचे?सद्गुरु जग्गी वासुदेवसंपादित(लोकमत भक्ती यू ट्युब चॅनल)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या