- ब्रह्मकुमारी नीतावायू हे वेगाचे प्रतीक आहे. धूळ, माती, कचरा याला उडवून लावण्याची, फेकण्याची शक्ती आहे. जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात तेव्हा त्यांना वाऱ्यासारखे उडवून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. विचारांचा कचरा रोज मनातून फेकण्यासाठी, घालवण्यासाठी वायूसमान वेग धरण्याची कला आपण आत्मसात करावी. प्रकृतीचे सान्निध्य विचारांना नवजीवन देते. भारतभूमीवर कितीतरी योगी, तपस्वी, साधू होऊन गेले ज्यांनी निसर्गाशी सुसंवाद साधून परमात्म सुखाची प्राप्ती केली. निसर्गाची सोबत मनुष्याला विनाशी इच्छांपासून दूर घेऊन जाते. स्वसंवाद साधण्यासाठी मदत करते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य ‘ध्यान साधना’चे महत्त्व समजत आहे. पण ध्यान करण्यासाठी स्वत:ला एखाद्या खोलीत बंद करून बसण्याची गरज नाही. मनाला मुक्ततेचा अनुभव करायचा असेल तर प्रकृतीचा सहवास करावा. ध्यानधारणा करताना खूपदा संगीत लावले जाते. ज्यामध्ये लाटांचा, वाºयाचा किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकतात आणि त्या अनुसार चित्रीकरण करत करत मनाला एकाग्र केले जाते. पण जर निसर्गाचे सान्निध्य मिळाले तर मनातल्या दुर्भावना दूर करण्यास, स्वत:ला परिवर्तन करण्यास मदत मिळते, असंभव वाटणाºया सर्व गोष्टी सहज संभव वाटू लागतात. एक प्रकारची वेगळीच ऊर्जा आपल्यात निर्माण होते आणि त्याला लाभ होतो. आपल्या या वेगवान जीवनाला थोडे संथ करण्यासाठी, मनाचे उधाण कमी करण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी सर्वांगसुंदर निसर्गाशी संवाद साधा. मग बघाच कसे जीवनाचे रूप कसे पूर्णत: बदलून जाते की नाही?
निसर्गाच्या सान्निध्यात दुर्भावना होतात दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 5:32 AM