शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 4

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:21 PM

आमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण  म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे.

- सदगुरू श्री वामनराव पैदारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा नाहीआमच्या राष्ट्रात दु:ख का याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी हे एक मुख्य कारण  म्हणजे लोकसंख्येत झालेली प्रचंड वाढ.भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण देखील लोकसंख्येत वाढ हेच आहे. लोकसंख्या जितकी वाढेल तितका भ्रष्टाचार देखील वाढत जाईल.मागणी व पुरवठा हा जो अर्थशास्त्राचा एक नियम आहे त्याप्रमाणे मागणी जास्त व पुरवठा जर कमी असेल तर तिथे भ्रष्टाचार सुरू होतो.आमच्या तरुणपणी तरुण मुलांना कॉलेजमध्ये या म्हणून बोलवत असत.आता 90 टक्के असतील तरी या नाहीतर येऊ नका असे म्हटले जात.लोकसंसख्या एवढी वाढलेली आहे की त्यामुळे भ्रष्टाचार देखील वाढतो आहे.भ्रष्टाचार होतो असे म्हणत असताना तो का होतो याच्या मुळाशी आपण जात नाही.त्यामुळे आज समाजात जे प्रॉब्लेम्स आहेत त्यापेक्षा अधिक प्रॉब्लेम्स भविष्यात वाढत जातील.मग कुणी कितीही आश्वासने दिली तरी त्याची पूर्तता करणे केवळ अशक्य होईल.जीवनविद्या सांगते दु:ख का निर्माण होते याची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी दारिद्रय हे प्रमुख कारण आहे.दारिद्रयाइतका मोठा शाप दुसरा  कोणताही नाही.हे दारिद्रय कमी करण्यासाठी मुख्य उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करणे हा होय.एकदा का इथे नियंत्रण आले की पुढील सर्व गोष्टी आपोआप नियंत्रणात येतील.लोकांना खायला अन्न मिळेल,लोकांना रहायला घरे मिळतील,आज लोकांना रहायला घर नाही हयाचे कारण काय? एखादी बिल्डिंग उभी केली व अर्ज मागवले तर त्यासाठी लाखोनी अर्ज येतात.थोडक्यात मागणी जास्त व घरे लिमिटेड आहेत.यासाठी लोकांनी शहाणपणाने वागले पाहिजे व सरकारने देखील आपले धोरण बदलले पाहिजे.हयाला काय वाटेल त्याला काय वाटेल असे म्हणत राहिले तर पुढच्या  पिढया तुम्हांला कधीच क्षमा करणार नाहीत.एक काळ असा होता की विवाहित स्त्रीला “अष्टपुत्र सौभाग्यवती भव” असा आर्शिवाद दिला जायचा.अष्टपुत्र म्हणजे आठ मुलगे व  आणखी मुली देखील म्हणजे एकूण डझनाच्या खाली काही बोलायचे नाही.तुम्ही म्हणाल त्यावेळी वामनराव असे कसे होत होते हो. किंवा त्यावेळी हा आर्शिवाद बरोबर होता का? सांगतो…त्यावेळी काय होते आपला शेतीप्रधान देश होता त्यामुळे अन्नाचा पुरवठा मुबलक होता व दुसरे म्हणजे युध्द वरचेवर व्हायची त्यामुळे युद्धामध्ये माणसे खूप मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडायची.घर चालविण्यासाठी शेती करावी लागे व शेतीसाठी घरात माणसे भरपूर असावित म्हणून अष्टपुत्र व्हावेत असा आर्शिवाद दिला जात असे.त्यावेळी घरातील स्त्रीया घर सांभाळायच्या व पुरुषांनी शेती सांभाळायची म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारे केलेली समान श्रमविभागणी होती. त्यामुळे त्या काळी लोकसंख्या वाढली तरी चालत असे.लोकसंख्या वाढली तरी ती युध्द-लढाया यामुळे माणसांची संख्या कमी होत असे.असं म्हणतात की आपण दु:ख ओढवून घेतो व सुखाला दूर फेकतो.पण खरंतर सुखाला जवळ करायचे व दु:खाला फेकून द्यायचे  असते.आता या दु:खाला जवळ करायचे व सुखाला फेकून दयायचे की सुखाला जवळ करायचे व दु:खाला दूर करायचे हे तू ठरवायचे आहेस कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार|