- फरेदुन भुजवाला
विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांची स्वामी विवेकानंद यांच्यावर नितांत श्रद्धा होती़ गोएंका म्हणतात, स्वामी विवेकानंद यांनी आपल्या जीवनाच्या अंतिम दिवसातील काही दिवस बोधगयातील बोधीवृक्षाखाली ध्यान केले होते़ त्यांनी बोधीवृक्षाखाली कोणती साधना केली हे माहिती नाही. मात्र त्यांनी विपश्यना केली नव्हती़ कारण तेव्हा भारतात विपश्यनेचे पुनरागमन झाले नव्हते़ तरीही भगवान गौतम बुद्ध यांचे स्वामी विवेकानंद यांनी अगदी सुंदर शब्दात वर्णन केले आहे़ स्वामी विवेकानंद म्हणतात, एक हजार वर्षांपर्यंत ज्या विशाल तरंगांनी संपूर्ण भारताला सिंचित केले होते, त्याच्या सर्वाेच्च शिखरावर एक आणखी महामहीम मूर्तीला पाहतो, ते आमचे शाक्य मुनी गौतम आहेत़ बुद्ध संसारात श्रेष्ठ चरित्रवान व्यक्ती आहे़ नैतिकतेचा एवढा मोठा साहसी प्रचारक संसारात पुन्हा उत्पन्न झाला नाही़ तो बुद्ध होता, ज्याच्याजवळ अभीष्ट मस्तिष्क, अभीष्ट शक्ती आणि विस्तीर्ण आकाशाएवढे अभीष्ट ह्रदय होते़ भगवान कर्मयोगाचे ज्वलंत आदर्श स्वरूप होते आणि ते ज्या उच्च अवस्थेला पोहोचले होते, त्यावरून असे ज्ञात होते की कर्मशक्तीद्वारा आम्ही सुद्धा उच्चतम आध्यात्मिक स्थिती प्रात्प करू शकतो़ असे अनेक महापुरूष होते जे स्वत:ला ईश्वराचे अवतार म्हणत होते आणि विश्वास देत होते की जे त्यांच्यावर श्रद्धा ठेवतील ते स्वर्ग प्रात्प करू शकतील़ पण बुद्धांच्या ओठावर अंतिम क्षणापर्यंत हेच शब्द होते, आपली उन्नती आपल्याच प्रयत्नाने होईल़ दुसरा कोणी त्यामध्ये तुमचा सहायक होऊ शकत नाही़ स्वत: आपली मुक्ती प्रात्प करा़ स्वामी विवेकांनद यांचे भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी असे गौरवउद्गार असले तरी याबाबत गोएंका म्हणतात, एवढे सर्व असूनही विवेकांनद यांच्या उपदेशात कोठे काही चूक होती, कोठे काही कमी होती, ज्यामुळेच विवेकानंद यांना म्हणावे लागले, मी बुद्धांचा भक्त राहिलो़ पण त्यांच्या सिद्धांताचा नाही़