शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

आनंदाचे उद्गार चिन्ह!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 10:08 PM

काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’.

- रमेश सप्रे

काही वर्षांपूर्वी एक अप्रतिम हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्याची मध्यवर्ती कल्पनाच होती ‘आनंद’. तेच त्या चित्रपटाचं नावही होतं. जीवनातील कोणत्याही गोष्टीचा आनंदानं स्वीकार हा संदेश तर त्यात होताच; पण जीवन जसं आपल्याला शोधत येईल, आपल्या भेटीला येईल तसा त्याचा स्वीकार हाही महत्त्वाचा. इंग्रजीत म्हटलंय ना ‘मीट लाईफ अ‍ॅज इट सिक्स यू’ कशाबद्दल म्हणजे अगदी कशबद्दल तक्रार न करणारी व्यक्ती आनंदी असते. ‘आनंद’ चित्रपटातील एक मार्मिक प्रसंग पाहू या.

आनंदचा डॉक्टर मित्र त्याच्या रक्त वगैरेच्या तपासण्यांचे रिपोर्टस पाहून गंभीर होतो. ते पाहून आनंद विचारतो, ‘मला काय झालंय?’ डॉक्टर सांगतो. ‘कॅन्सर!’

आनंद यावर हसत म्हणतो, ‘शक्यच नाही. एवढा छोटा रोग मला होणं शक्यच नाही. याच्यापेक्षा इन्फ्लूएंझा-टायफाईड हे रोग मोठे वाटतात. डॉक्टर, तुझ्या भाषेत सांग माझ्या रोगाचं नाव.’ यावर डॉक्टरचं उत्तर ‘लिंफोसर्कोमा आॅफ् द इंटेस्टाईन (आतड्याचा कर्करोग)’ हे ऐकून टाळी वाजवत आनंद म्हणतो ‘ये हुई ना बात! कैसा किंगसाईज रोग है!’

काय वृत्ती आहे ही! मूर्तीमंत आनंद! ही सारी उद्गारचिन्हं पाहून एक विचार मनात आला की आनंदाचं विरामचिन्ह कोणतं? पूर्णविराम नाहीच. कारण आनंद सततच उसळत असतो. स्वल्पविरामही नाही. कारण आनंदाचे तुकडे पाडता येत नाहीत. प्रश्चचिन्हही नाही. आनंदाचं विरामचिन्ह उद्गारवाचकच असतं. निसर्गातल्या सूक्ष्म जीवांपासून महाकाय प्राण्यापर्यंत, जीवनातल्या लहान घटनेपासून महान घटनेपर्यंत, बदलणाऱ्या ऋतूतील प्रत्येक दृश्यात मग तो कोसळून चिंब भिजणारा पाऊस असो किंवा नयनमनोहर इंद्रधनुष्य असो, अंधाºया रात्री आकाशात चमचमणारे असंख्य तारे असोत की सर्द थंडीतलं आंधळं बनवणारं धुकं असो साºया अनुभवात दडलेला असतो एक उद्गार... तो आनंदाचाच असतो; पण त्यासाठी आपण संवेदनाक्षम असायला हवं.

लहान मुलं आनंदाच्या मूर्ती असतात. असं म्हणतात की लहान मुलं स्वर्गीय आनंदाचा उपभोग घेत असतात कारण त्यांच्या अवतीभवतीच स्वर्ग पसरलेला असतो. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची जिवंत जिज्ञासा आणि कधीही न कोमेजणारं कुतूहल. लहान मुलं विचारत असलेल्या असंख्य प्रश्नात त्यांची केवळ ज्ञान मिळवण्याची इच्छा नसते तर आजूबाजूच्या अनेक गोष्टीत दडलेल्या रहस्याचं अनावरण झालेलं त्यांना हवं असतं. यात वैचारिक, वैज्ञानिक संशोधनापेक्षा गुपितांच्या शोधातून मिळणारा आनंद असतो.

असं बालमन आपल्याला मिळालं तर आनंद सागरावर अखंड पोहत राहणं अवघड नाही. यालाच म्हणतात ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणं’ म्हणजेच वय वाढलं तरी आपल्या आतलं लहान मूल जिवंत ठेवायचं. गंमत म्हणजे बालपणी जी कल्पनाशक्ती मनाच्या मोकळ्या आकाशात आनंदाचा प्रकाश भरून टाकते तीच कल्पनाशक्ती मोठेपणी चिंता-काळजीचं ग्रहण आनंदाला लावते. याला जबाबदार आपणच या कल्पनाशक्तीला विचारशक्तीची त्याहूनही विवेकाची जोड दिली तर संसारसागर तरुण जाणं अगदी सुलभ होतं. ज्ञानोबा माउलीची एक प्रसिद्ध ओवी आहे.

मज हृदयी सद्गुरु। जेणे तारिलो हा संसारपूरु।म्हणोनि विशेषे अत्यादरु। विवेकावरी।।

संसारात घडणाºया घटना या भवसागरावरच्या लाटा समजल्या तर त्या तरुन जाण्यासाठी तारून नेणारा (भवतारक) सद्गुरु आपल्याला विवेकशक्ती देतो. त्यामुळे प्रत्येक घटनाप्रसंगाचा सकारात्मक अर्थ लावता येतो आणि आनंदाचा अक्षय अनुभव घेता येतो.कवयित्री बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी. यांच्या जीवनातला एक हृद्य प्रसंग आपल्याला आनंदाचं सूत्र सांगून अंतर्मुख करतो. त्यांना जेव्हा कॅन्सर झाल्याचं डॉक्टर सांगतात तेव्हा ते आनंदानं उद्गारतात कॅन्सर! म्हणजे नो आन्सर! (कॅन्सरला उत्तर नाही. उपाय नाही) ज्यावेळी डॉक्टर रक्ताचा कॅन्सर (ल्युकेमिया) झालाय म्हणून सांगतात तेव्हा सोपानदेवांचे हजरजबाबी उद्गार असतात. ‘रक्ताचा कॅन्सर! व्वा! जीवन म्हणतंय आता तरी विरक्त व्हा!’ कमालीची आनंदी वृत्ती आहे ना ही!

एकूण काय आनंद मिळवणं, आनंदी राहणं बिल्कुल अवघड नाही. अवघड आहे ती आनंद मिळवण्यासाठी आवश्यक ती दृष्टी नि वृत्ती. एकदा हे जमलं की आपली नि इतरांची प्रत्येक कृती आनंदाची खाण बनून जाईल. यासाठी हवं सद्ग्रंथांचे वाचन-मनन नि चिंतन. तसंच सदाचरण नि त्याला पूरक पोषक सत्संगती. म्हटलं तर हे आपल्याला सहज शक्य आहे नाही?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक