शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साधनेचे फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 6:53 AM

बहुतांश लोक भोगलालसेने पछाडलेले असतात.

मत्त: परतरं नान्यत्किश्चिदस्ति धनश्चय.मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव।।गीता:।।‘पार्था, तू हे प्रथम लक्षात घे की, माझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाशिवाय, या विश्वात दुसरे सत्य नाही. मीच या दृश्य विश्वाला कारणमात्र आहे. हे प्रगाढ विश्व माझ्याचमुळे निर्माण झाले आहे आणि शेवटी ते प्रगट विश्व मजमध्येच विलीन होणार आहे. या विश्वात मी ओतपे्रत भरून आहे. एका परमेश्वराची सत्ता या विश्वात कार्यरत आहे. भगवंतच या विश्वाचे मूळ कारण आहे. सूतामध्ये मण्यांऐवजी सूताचेच मणी ओवले, तर तो धागा आणि ते सूताचे मणी एक सूतच असते ना! त्याप्रमाणे, या संपूर्ण दृश्य विश्वात सर्वत्र मीच व्यापून आहे. माझ्या अस्तित्वाशिवाय या विश्वात दुसरे काहीच नाही, हे तू ध्यानात घे, पार्था...बहुतांश लोक भोगलालसेने पछाडलेले असतात. त्यांच्याभोवती वासनेचा अजगरी विळखा पडलेला असतो. ‘परमेश्वराची प्राप्ती करून घ्यावी,’ हा विचार त्या वासनाग्रस्त दुर्दैवी जिवांच्या स्वप्नातसुद्धा डोकावत नाही वा तशी इच्छासुद्धा त्यांच्या विषयांध मनात उमलतच नाही. या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सत्यदर्शन घडविताना म्हटले की,मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।यततामपि सिध्दानां कश्चिनन्मां वेत्ति तत्वत:।।पार्था, माझे असंख्य भक्त या मानवी विश्वात वावरत असतात. त्यांच्यातली चंचल देहबुद्धी मनात वासना प्रदीप्त करून त्या असंख्य भक्तांना, वासनापूर्तीच्या लालसेने त्यांना माझ्या भक्तीच्या दिशेने वळविते, असे कामनाग्रस्त भक्त जे असतात, त्यांच्या भक्तीचा आदर करीत, मी त्यांच्या निश्चितपणे पूर्णसुद्धा करतो, परंतु पार्था, तू एक लक्षात ठेव की, या असंख्य भक्तांमधला एखादा याचनाविरहित आयुष्य जगणारा माझा एखादा परमभक्त असतो की, जो फक्त अत्यंत कष्टसाध्य उपासना केवळ माझीच प्राप्ती व्हावी म्हणून करतो. असे जे थोडे परमभक्त या मानवी विश्वात आहेत, त्यातला एखादाच माझा परमभक्त मला यथार्थपणे जाणतो की, मी संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. चराचरात मीच दाटून आहे. पार्था, तू लक्षात ठेव की, फारच थोडे सिद्ध पुरुषोत्तम माझ्या अस्तित्वाचा वेध घेत मला येऊन मिळतात. ते भक्त दुर्लभच असतात. भगवंतांची प्राप्ती होणे, हे आपण करीत असलेल्या निस्सिम साधनेचे अतिशय रसाळ असे शाश्वत फळ आहे.-वामन देशपांडे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक