शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Ganesh Chaturthi 2018: सुखकर्ता दुःखहर्ता... समर्थ रामदास स्वामींनी रचलेली संपूर्ण आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:07 PM

रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेशस्तवन प्रसन्नतेची अनुभूती देतं.

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ही आरती रचली आहे. रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेश गौरव गान प्रसन्नतेची अनुभूती देतं. रामदासांनी रचलेली श्री गणेशाची आरती ही सात कडव्यांची आहे, पण आपण त्यातील तीनच कडवी म्हणतो. या गणेशोत्सवात आपल्या घरच्या बाप्पापुढे ही संपूर्ण आरती म्हणून पाहा... वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ 

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ 

माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥ 

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥ 

छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ 

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥ 

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥ 

!!गणपती बाप्पा मोरया!!

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८