१३ सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. हा उत्सव पुढील दहा दिवस म्हणजे २३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. घराघरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. अशात काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. घरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करणार असाल तर खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत असे मानले जाते.
या गोष्टी टाळा
१) गणपती बाप्पा हा सर्वातआधी पूजला जाणारा देव आहे. घरात श्री गणेशाची स्थापना केली असेल तर सकाळी आणि सायंकाळी जेवण तयार केल्यानंतर आधी बाप्पाला नैवेद्य दाखवावा त्यानंतर स्वत: जेवण करावे, असे सांगितले जाते.
२) गणेशउत्सवादरम्यास घरात बाप्पा असेल तर भांडणं करु नका. याने बाप्पाच्या येण्याने प्रसन्न झालेलं वातावरण बिघडतं. सोबतच उत्साह सुद्धा कमी होतो.
३) शास्त्रांनुसार, गणेश स्थापनेच्या पहिल्या दिवशी बाप्पाला तुळशीची पाने वाहिली जातात. पण त्यानंतरची नऊ दिवस बाप्पला तुळशी पाने वाहू नयेत असे मानले जाते. इतर दिवशी केवळ दुर्वा वाहावीत.
४) गणेश उत्सवाचे १० दिवस घरात मासांहार करु नये किंवा मद्यसेवन करु नये.
५) सकाळी उशीरापर्यत झोपून राहू नका. सकाळी लवकर उठा आणि लवकर आंघोळ करुन बाप्पाची पूजा करा.
६) या दिवसात कोणत्याही प्रकारचा आळस करु नका, तसेच घरात स्वच्छता ठेवा.
७) सायंकाळी झोपणे टाळावे. कारण ही वेळ बाप्पाची पूजा करण्याची असते.