शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Ganesh Chaturthi 2019: 'सुखकर्ता दु:खहर्ता...' ही श्रीगणेश आरती कोणी रचली आहे, तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 1:46 PM

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. पण आपल्यापैकी अनेकजणांना बाप्पाची आरती कोणी रचली हे माहित नाही...

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो, तसंच आरतीची सुरुवातही बाप्पाच्या 'सुखकर्ता दुःखहर्ता' या आरतीनेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ही आरती रचली आहे. रामदास स्वामी हे प्रभू श्रीरामाचे दास आणि हनुमानाचे भक्त. पण, गणपतीवरही त्यांची तितकीच श्रद्धा होती. त्यांनी आपल्या रचनेतून गणरायाच्या रूपाचं, गुणांचं वर्णन इतकं नेमकेपणानं केलं आहे की, गणेशभक्तांना हे गणेश गौरव गान प्रसन्नतेची अनुभूती देतं. रामदासांनी रचलेली श्री गणेशाची आरती ही सात कडव्यांची आहे, पण आपण त्यातील तीनच कडवी म्हणतो. या गणेशोत्सवात आपल्या घरच्या बाप्पापुढे ही संपूर्ण आरती म्हणून पाहा... वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ 

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥ 

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ हिरेजडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥ 

माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥ 

चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥ 

छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥ 

ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥ 

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना ॥ जय ० ॥ ७ ॥ 

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥ 

!!गणपती बाप्पा मोरया!!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी