शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

गीतार्थ थोरवी ....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 2:44 PM

का सिंद्धाताचे पालन जरी प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल.

भारतीय ग्रंथ सारस्वतामध्ये सर्वांचा मुकूटमणी म्हणून कोणता ग्रंथ असेल तर भगवद्गीता होय. प्राचीन भारत वर्षातील या ग्रंथाने मानवी जीवन कसे जगावे, याचा आदर्श वस्तुपाठच विशद केला आहे. अर्जुन या ग्रंथाचा नायक असून, भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत. आपल्या प्राणसख्या असणाऱ्या अजुर्नाला ते त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे युद्धभूमीवरील गीता ग्रंथ होय. मानवी जीवनसुद्धा एक युद्धभूमी असून, प्रत्येकाला आपल्या जीवनातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी एका आदर्श मार्गदर्शकाची आवश्यकता असते. खºया ज्ञानाची गरज भासते. मानवी जीवन हे जेव्हा काय करावे? व काय करू नये? अशा द्वंद्वामध्ये सापडते तेव्हा कोणता विचार अंगिकारावा हा प्रश्न पडतो. त्यावेळी एकच भगवद्गीता विचार आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधून देऊ शकतो. मानवी जीवनात उत्पन्न होणाºया अनेक परस्थितीतींची व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून प्राप्त होतात. म्हणून प्रत्येकाने हा गीता विचार अंगीकारावा. मानवाला जेव्हा आपले शरीर आणि मन यांच्या माध्यमातून अनेक दु:ख आणि अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याने भविष्यकाराला आपला हात दाखविण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन भगवद्गीतेतील परमेश्वरासोबत असलेल्या आपल्या वास्तविक संबंधाना समजून घेण्याची खरी वेळ जीवनात आलेली असते.भगवद्गीता ही सर्वांची माउली असून, सर्वांना आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय? ते प्राप्त करण्यासाठी तू कोणते कर्म करीत आहेस ? असा प्रश्न विचारीत असते व त्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी सदोदीत मार्ग दाखवित असते. गीतेचा कर्मसिद्धांत हा मानवी जीवनाला मिळालेला अमृतकुंभच होय. त्या एका सिंद्धाताचे पालन जरी प्रत्येकाने केले तर आज मानवी जीवनातील असंख्य समस्यांना निश्चितच उत्तर सापडेल. भगवान श्रीकृष्णांनी अजुर्नाला सुद्धा तोच महत्त्वाचा विचार सांगितला होता. तू तुझे नियत कर्म कर; परिस्थिती कोणतीही असो.यत्र योगेश्वर कृष्ण: यंत्र पार्थ धनुर्धर:।तत्र श्रीविजयो भूतिरध्रुवा नितीर्ममतीम।।अजुर्नाने जेव्हा युद्धामध्ये माझ्या समोर माझे काका, मामा, गुरू आहेत. युद्ध कसा करू? असा प्रश्न केला तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या समोर आलेल्या परिस्थितीचा सामना तू कर, असे सांगितले. तुझे कर्मच तुला तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आहे.स्वत:च्या कर्मानेच मनुष्य हा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत असतो. स्वकर्मेच त्याला विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात. ज्ञानप्राप्तीनंतर जशी कर्माची चिंता उरत नाही, त्याप्रमाणेच जीवनामध्ये कर्मयोगाला जर आत्मज्ञानाची जोड दिली, तर जीवन कृतकृत्य होते. जेव्हा मनुष्य आपले जीवनाचे मूळ ध्येय विसरतो, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मुळ ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतात. हा गीतेतील महत्त्वाचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे. गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या पाच तत्वांचे महत्त्वाचे विस्तृत वर्णन आलेले आहे. पहिले चार तत्त्व जरी मानवी जीवन शक्तीच्या बाहेरील असले तरी. मनुष्याने कर्म मार्गाचे आचरण करावे. ईश्वराने दिलेले नियत जीवनमान योग्य कर्म करून जीवन आनंदित करण्यासाठी आहे. रडत बसण्यापेक्षा नियत कर्म करा, हा सिद्धांत जर सर्वांनी अंगिकारला तर जीवनातील असंख्य प्रश्नांना उत्तरे आपोआपच सापडतात. हा गीता विचार सर्वांनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन । मा कर्मफलेहेतूर्भूर्मा ते संङगोरस्तवकर्मणी ।। २/४७हा जीवन कर्मविचार केवळ एक विचार नसून ती आपल्याला भगवान श्रीकृष्णांसारख्या प्रभूंनी दिलेला जीवनसुखमयतेचा महत्त्वाचा संदेश आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी कर्माची महती आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे.जग तुम्हाला कधीही लक्षात ठेवत नाही तर तुम्ही केलेल्या कर्मांनाच आठवत असते. मग ते कर्म तुम्हाला चांगले म्हणून ओळखतात किंवा वाईट म्हणून ओळखतात. त्यासाठी कर्म विचारच गीताई माउलीचा जीवन विचार आहे. असे या श्लोकातून गीताई आपल्याला संदेश देत आहे.श्रीमद् भगवद् गीता ग्रंथ आनंदचिद्घन, ऐश्वर्याने परिपूर्ण चराचराने वंदन केलेल्या परम पुरुषोत्तम साक्षात भगवान श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे. अत्यंत रहस्याने भरलेली आहे. परमदयाळू श्रीकृष्णांच्या कृपेने जे पुरुष श्रद्धा आणि प्रेमळ विशुद्ध भक्तीने आपल्या अंतकरण भरून भगवद् गीतेचे मनन करतात, तेच या गीतेच्या स्वरूपाचे काही अंशी दर्शन घेऊ शकतात. म्हणूनस्वकल्याण इच्छिणाºया स्त्री-पुरुषांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनचा आदर्श पुढे ठेवून स्वत: मध्ये अजुर्नासारखे दैवी गुण बाणवून श्रद्धा भक्तिपूर्वक गीतेचे श्रवण मनन अध्ययन करावे आणि भगवंताचा खूप आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.

-डॉ. हरिदास आखरे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक