जगाला प्रेम अर्पावे ’ हा संदेश पूज्य साने गुरुजी सांगून गेले. वास्तविक जीवनात प्रेमाला अनन्य साधारण महत्त्व आहे. खऱ्या जीवनाला प्रेमाशिवाय जग जिंकता येत नाही. खरे जीवन जे जगतात ते साध्या जीवनात हजारो लाखो लोकांचे कल्याण करतात, पण त्यासाठी निष्काम सेवा केली पाहिजे. जे स्वार्थी आहेत ते स्वत:ही सुखी नसतात व इतरांनाही सुख मिळू देत नाही. स्वार्थी व्यक्ती इतरांसाठी दु:खमय जीवन देतो, इतरांसाठी तो त्रासदायक ठरतो. परमार्थ करताना कोणताही मार्ग असो. भक्तीमार्ग असो, कर्म मार्ग असा ज्ञान मार्ग असो अथव योगमार्ग असो, कोणत्याही मार्गात व्यक्ती येत नाही. अहं ब्रह्मस्मी याला म्हणत नाही. मनात दांभिक भावना ठेवून परमार्थ होत नाही, मी आश्रमात जातो, सेवा करतो, अनेक ग्रंथ, पोथी वाचतो सगळे मला मानतात. याला अहं ब्रम्हास्मी म्हणत नाही. याला अहंगर्वस्त्री असेच म्हणावे लागेल. आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आपले व्यक्तिमत्त्व वाढविण्यासाठी निष्काम सेवाच कामी येते.कर्मण्ये वाधिकारस्ये.... असे म्हणत भगवंतांनी पुरुषार्थाचा अर्थ सांगितला आहे. म्हणून अहंचे विसर्जन करून कर्म गतीकडे लक्ष दिले पाहिजे. जीवनाचे सार कर्म आहे. पण हे कर्म करताना मनात निष्काम भाव मात्र असायला हवा. मी जे कर्म करीत आहे ते मी करीत नसून भगवंताचा सेवक म्हणून हे कर्म करीत आहे. भगवंतांच्या सांगण्यावरून मी हे कर्म करीत आहे. माझेवर सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून हे कर्म माझे हातून घडत आहे. हा भाव ज्यावेळी मनात येईल. तेव्हा हा अहं ब्रह्मास्मिचा अनुभव येईल. अहं भाव नष्ट होऊन आत्मज्ञानाची प्राप्त होईल. तेव्हा आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल. तेव्हाच ती व्यक्ती ब्रह्मस्वरूप होईल व ईश्वराशी एकरूप होईल आणि ईश्वराच्या प्रेमाला पात्र होईल. मनुष्य जितका स्वार्थी, अहंकारी होईल, तितकाच तो जीवनात दु:खात बुडत जातो. प्रभू प्रेमात मागणी नसते तो सेवा भाव असतो. दुसºयासाठी मागणे याला सेवा म्हणतात ‘जे मज देशी.. ते दे इतरांशी... काय मागू तुला प्रभुजी दर्शन देई मला’ असा सेवाभाव असायला हवा. जेव्हा प्रेमपूर्वक सेवा कराला तेव्हा प्रभुचरणाचा सेवेचा आनंद घेता येईल.- नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.
जे मज देशी ते दे इतरांशी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:21 PM