शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

आनंद तरंग - निसर्गाच्या सान्निध्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 6:25 AM

खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत उभे राहून हिरवेगार वृक्ष पाहावे, पक्षांची किलबिल ऐकावी

 ब्रह्माकुमारी नीता खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत उभे राहून हिरवेगार वृक्ष पाहावे, पक्षांची किलबिल ऐकावी, निसर्गाचे छोटेसे सुंंदर रूप पाहूनही मनाला सुखद अनुभव मिळू शकतो. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा खास वेळ काढून जवळपासच्या बागेत किंवा समुद्राच्या किनारी बसून मनाला ताणतणावाच्या विचारांपासून रिक्त करावे. प्रकृतीची पाचही रूपे (जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी) आपल्याला खूप काही देत आहेत. त्यांंची साथ आपल्याला नि:स्वार्थ प्रेम करायला शिकवते, उदार होऊन दुसऱ्यासाठी खूप काही करण्याची शक्ती देते, विशाल हृदयामध्ये सगळे हेवेदावे सामावून घेण्याची कला शिकविते, मनाला पवित्र करण्याची विधी शिकविते, कोणी कसेही असो परंतु मायेचा विसावा द्यायला शिकविते. निसर्गाने बनविलेल्या नियमानुसार चालणारी व्यक्तीच आपले तन-मन स्वस्थ ठेवू शकते. ज्यांनी शरीराची १०० वर्षे ओलांंडली अशा काही लोकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लवकर उठणे, लवकर झोपणे त्याचबरोबर समतोल आहार आणि विचारांंची सकारात्मकता यावर विशेष लक्ष ठेवले. पहाटेचा सूर्य, त्याची सोनेरी किरणे, ढगांवर चढलेली त्या किरणांंची लालिमा, पक्षांचे उडते थवे, कोंबड्यांची आरव, जसे जीवनालाच नव्याने सुरुवात करायला सांगते. रोज निसर्ग उदार होऊन आपले मातृप्रेम आपल्यावर ओतत असतो. गुणांची उधळण करीत राहतो. प्रकृतीचे एक-एक रूप अनेकानेक गुणांनी भरले आहे. ‘धरती माता’ हा शब्द आपण ऐकतो. खरंच या वसुंधरेने आपल्या भल्यामोठ्या पदरात सर्वांना सामावून घेतले आहे. पशू, पक्षी, मनुष्य सर्वांचे पालन-पोषण करीत राहते. आज या धरेवर गगनचुंबी इमारती बनविल्या जात आहेत.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक