शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

प्रपंचातील आसक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 5:28 AM

भगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात.

- वामन देशपांडेभगवंतांनी आपल्या सर्वच भक्तांना सांगितले आहे की, जो भगवंतांची अनन्यभाव अर्पण करून, सतत त्याच्याच नामाच्या सहवासात आपल्या अंत:करणातली भक्ती तेजोमय करतो, त्या परमभक्तावर भगवंत आपल्या कृपेचा अखंडपणे वर्षाव करतात. अशा परमभक्तांपाशी समत्व बुद्धी नांदत असते, तीच भगवदकृपा असते. अशा श्रेष्ठ परमभक्तांच्या मनात मर्त्य विषयाचा कोलाहल चुकूनही उत्पन्न होत नाही. कारण एकच. भगवंतांचे नाम मर्त्य विचारांना कधीच थारा देत नाही. अशाच श्रेष्ठ परमभक्तांना जणू एक सिद्धी प्राप्त झालेली असते आणि ती म्हणजे त्यांना शास्त्रवचनांच्या गडद छायेत वावरता, वा मनन-चिंतनाच्या अक्षय फेऱ्यात न अडकता, भगवंत स्वत: त्यांना तत्त्वज्ञानाचे अक्षय भरलेले कुंभ प्रेमाने देतो. असे परमभक्त जे जे काही प्रगट करतात, तो इतरांसाठी तत्त्वबोध होतो. जणू भगवंतच त्या आपल्या लाडक्या परमभक्तांच्या मुखातून सर्वसामान्य माणसांना तत्त्व समजावून सांगत असतो. भागवतात श्रीकृष्णांनी उद्धवाला उपदेश केला होता की,प्रायेण भक्तियोगेन सत्सडेग विनोद्धव।नोपायो विद्यते सध्येङ्प्रायणं हि सतामहम।। भागवत ११:११:४८।।उद्धवा, सत्संग आणि हृदयस्थ शुद्ध प्रवाही परमभक्ती हीच माझ्या प्राप्तीची सर्वोत्तम साधना आहे. योग, सांख्य, जप-जाप्य, व्रतवैकल्य, तीर्थाटणे मला विशेष प्रसन्न करीत नाहीत. केवळ ऋषीमुनींच्या सत्संगात माझी प्राप्ती निश्चितणे होते, हे तू लक्षात घे.भगवंतांनी आपले भक्तीरहस्य उलगडून सांगताना आपल्या अत्यंत लाडक्या शिष्याला अतिशय हळुवार शब्दात समजावले होते की,समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रिय :।ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम।।पार्था, आपल्या डोईवरील निळेभोर पसरलेले आकाश सर्वत्र सारखेच असते ना, तसा मी परमेश्वर सर्वत्र सारखाच आहे. चराचरात मी अखंडपणे व्यापून आहे. संपूर्ण जीवसृृष्टीमध्ये मी समानच आहे. आकाश जसे मानवी सुखदु:खांपासून पूर्णपणे अलिप्त असते, त्याप्रमाणे मीसुद्धा मानवी सुखदु:खांपासून अलिप्त आहे. मी कुठल्याही जीवाचा द्वेष करीत नाही की कुठल्याही जीवात प्रेमभावनेनं गुंतत नाही. परंतु जो माझा परमभक्त माझ्याच भजन-कीर्तनात सदैव दंग असतो, ते परमभक्त माझ्या प्रेमाचा विषय होतात. मी परमेश्वर त्याच माझ्या परमभक्ताच्या हृदयगाभाºयात स्थिर होतो. ते माझे होऊन जातात आणि मी त्यांचा होतो. हे माझे भक्तीरहस्य तू ध्यानात ठेव. त्याचे महत्त्वाचे कारण हे आहे की, ते माझे परमभक्त, करीत असलेल्या प्रपंचात आसक्त नसतात. त्यांचा शरीरभाव यत्किंचितही सळसळत नसतो. ते माझे परभक्त सदैव माझ्या अस्तित्वात विरघळून जाण्याचा प्रयत्न करीत फक्त माझी प्रसन्नता मिळवतात. पार्था ते खरे आत्म्याच्या साक्षीने जगत असतात...भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वच परमभक्तांना अत्यंत पे्रमाने भक्तीसंदेश देतात की,मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरू।मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण।।भक्तश्रेष्ठ अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत लाडका भक्त होता म्हणून भगवंतांनी आपल्या अंत:करणातले गुह्यतम ज्ञान अर्जुनापाशी प्रगट केले. महत्वाचे कारण हे होते की, अर्जुन हा ‘अनसूयवे’ म्हणजे दोषदृष्टिरहित होता. भगवंतांनी स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा महिमा, फक्त अर्जुनालाच वर्णन करून सांगितला होता.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक