शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक ‘कुरआन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 2:38 PM

रमजान ईद विशेष...

नवी जीवनाचे एकही अंग असे नाही ज्याला कुरआनने स्पर्श केलेला नाही. कुरआन इस्लामी धर्मग्रंथ असल्याचा सर्वसाधारण समज आहे, मात्र ते वास्तव नाही. कारण कुरआनमध्ये अल्लाहने कुठेही तशी भूमिका मांडलेली नाही. अल्लाह सातत्याने कुरआनला समस्त मानवी समाजासाठीचा मार्गदर्शक ठरवतो. कुरआनची भूमिका, त्यातील तत्त्वज्ञान याविषयी अनेक विचारवंतांनी मत मांडले आहे. त्यातील बहुतांश जणांनी कुरआनला मुसलमान अथवा इस्लामपर्यंत मर्यादित करण्यास नकार दिला आहे.

कुरआन हे मानवी जीवनाविषयीचे कृतिशील चिंतन आहे. इस्लामने कुरआनमध्ये मांडलेल्या तत्त्वज्ञानाला कृतीची जोड महत्त्वाची मानली आहे. कुरआनमध्ये जीवनाचे नियम आहेत तसे श्रद्धेचेही आहेत. कुरआन ज्या पद्धतीने आर्थिक जीवनाचे नियमन करतो, त्या पद्धतीने सामाजिक जीवनाची संहिता स्पष्ट करतो. माणूस हा समाजाचा घटक आहे, त्यामुळे त्याच्यात सामाजिक नैतिकता विकसित झाली पाहिजे, ही भूमिका कुरआनने घेतली आहे. दत्तप्रसन्न साठे यांचे कुरआनविषयीचे चिंतन महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘‘कुरआनमधल्या सर्व आयती ‘श्रद्धा’ आणि ‘नेकी’ (हिताचे कार्य / पुण्यकर्म) याविषयीच आलेल्या आहेत. मानवाने जीवनाची मूलभूत तत्त्वे समजून घेऊन आपली उक्ती व कृती त्यांच्याशी सुसंगत ठेवली पाहिजे. खºया श्रद्धाळूने आपल्या दैनंदिन व्यवहारात व आचरणात ती शिकवण आणली पाहिजे.’’

याचा अर्थ कुरआनने सांगितलेली सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येक कुरआनच्या अनुयायाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुरआनच्या अनुयायांनी कुरआनने सांगितलेली समता समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या वागण्यातून मांडायला हवी. समाजामध्ये त्याचा घटक म्हणून वागताना त्याने परहिताविषयी सहिष्णू व संवेदनाक्षम असावे. बाजारात वावरताना त्याने आर्थिक शोषणाला छेद देऊन नफ्याचा व्यवहार प्रामाणिकपणे करावा. श्रमाच्या द्वारे वस्तूचे उत्पादन करताना त्या श्रमाचा योग्य मोबदला श्रमिकाला द्यावा.

इस्लाम वस्तूचे मूल्य व त्याच्या निर्मितीतील श्रमाचे मूल्य याविषयी देखील काही सूत्रे सांगतो. त्याच्या अनुयायांना सातत्याने कुरआन म्हणतो, ‘‘अत्याचार करणारे कधीही भरभराटीस येणार नाहीत.’’ (६/१३५) त्यानंतर माणसाने न्यायी असावे. न्यायाची भूमिका माणसाने प्रत्येक क्षेत्रात जपली पाहिजे. हे सांगताना कुरआन म्हणतो, ‘‘आणि जे लोक अल्लाहद्वारे प्रकाशित केलेल्या कायद्याद्वारे न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत.’’ (५/४५) त्यासोबतच कुरआन म्हणतो, ‘‘विश्वासघात कधीही करू नका.’’ (८/२७) कुरआन त्याच्या अनुयायांना आपल्या अस्तित्वामुळे इतरांचे अहित होणार नाही, याविषयी काळजी घेण्याचे आदेश वारंवार देतो.कुरआन एका अर्थाने सृष्टीचा ज्ञानकोश आहे.

कुरआनने राजकारणाविषयी मांडलेली सूत्रे पाहिल्यानंतर कुरआन राज्यशास्त्राची संहिता ठरते. सामाजिक जीवनाविषयीचे त्याचे विचार समाजशास्त्राचा ग्रंथ म्हणून त्याचा परिचय करुन देतो. जकात, जिझियासारख्या करांच्या माध्यमातून कुरआन आर्थिक तत्त्वज्ञान देखील मांडतो. जीवनावर परिणाम करणाºया प्रत्येक आर्थिक घटकाचे नियम कुरआनमध्ये सांगितलेले आहेत. कुरआनने नैतिकतेसोबत, शिष्टाचार सांगितला आहे. मानवतेसोबतच अन्यायाविरोधात लढण्याचे विद्रोही तत्त्व सांगितले आहे. कुरआनमध्ये खूप कमी ठिकाणी अल्लाहने थेट मुसलमानांना संबोधित केले आहे. त्यामुळे कुरआन हा ग्रंथ विश्वव्यापी ठरतो. 

कुरआनचा बोध मानवी जीवनाशी सर्वार्थाने निगडित आहे. सर्वस्पर्शी आहे. मानवी जीवनाचे एकही अंग असे नाही ज्याला कुरआनने स्पर्श केलेला नाही. कुरआन मानवी जीवनाचा सर्वव्यापी भाष्यकार आहे. त्याने सर्व विषयांवर विचार मांडले आहेत. कुरआनमध्ये भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, वंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, अर्थशास्त्र, कृषी, फलोत्पादन शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र असे अनेक विषय हाताळलेले आहेत. - आसिफ इक्बाल

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकRamzan Eidरमजान ईदRamzanरमजान