मुंबई : गणेश चतुर्थीपूर्वी हरतालिका मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र, हरतालिका साजरी करण्यामागचं कारण किंवा त्याचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. यासाठीच आज आम्ही तुमच्यासाठी यामागची कथा, शुभ मुहूर्त यासंदर्भात सर्वांनाच माहिती नसते.
कधी आहे मुहूर्त?
तृतीया तिथि प्रारंभ : 11 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटं. तृतीया तिथि समाप्त : 12 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 4 वाजून 7 मिनिटं. पहाटेचा हरतालिका पूजा मुहूर्त : 12 सप्टेंबर 2018 सकाळी 6 वाजून 15 मिनिटांपासून 9 वाजून 42 मिनिटांपर्यंत.
काय आहे आख्यायिका?
पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.
पूजाविधी
वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.