शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसं असेल नविन वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 3:21 PM

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस राहिले आहेत. लोकं खूप उत्सूक आहेत हे जाणून घेण्यासाठी की येणारं नवीन वर्ष कसं असेल.

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस राहिले आहेत. लोकं खूप उत्सूक आहेत हे जाणून घेण्यासाठी की येणारं नवीन वर्ष कसं असेल. हे येणारं वर्ष कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे.  तसचं तुमची कौटुंबिक आणि आर्थिक स्थीती या नवीन वर्षात कशी असणार आहे. असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर  तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण कर्मदाता शनी आपली रास बदलणार आहे. तसंच २४ जानेवारीला  शनी धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी  हे नवीन वर्ष फलदायी ठरु शकतं. 

मेष 

२०२० मेष राशीच्या  लोकांसाठी हे नवीन वर्ष फलदायी ठरणार आहे.  तुम्ही तुमच्या  कामाच्या क्षेत्रात या वर्षी भरपूर प्रगती कराल.  आर्थक गोष्टीत सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे. तसंच ज्यांचा विवाह झाला आहे. अशा लोकांनी सांभाळून राहायला हवं.

वृषभ   

या राशीच्या लोकांसाठी नविन वर्ष आवाहानात्मक असणार आहे. कारण या वर्षी तुमच्या करीअरच्या संबंधित अनेक चढ उतार येऊ  शकतात. त्यामुळे  संयम बाळगा तसंच आर्थिक वृध्दी होण्याची शक्यता आहे.  कुंटूबातल्या  लोकांसोबत राहत असताना तुम्हाला एकटं वाटू शकतं . वर्षाच्या शेवटाकडे येताना तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 

मिथुन 

मिथून राशीच्या लोकांसाठी हे नवीन वर्ष आर्थिकदृष्या फायद्याचं असेल. तसंच जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील ते मिळण्याची सुध्दा शक्यता आहे.  त्यामुळे तुमच्या पार्टनरला चांगले दिवस पहायला मिळतील. तसंच  प्रवास करत असाल तर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आरोग्याकडे  लक्ष देण्याची गरज आहे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास त्याचा वाईट परीणाम पहायला मिळू शकतो.

कर्क  

कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात हे नवीन वर्ष सगळ्यात जास्त आनंद घेऊन येणार  आहे. जे लोकं पार्टनर किंवा नोकरी शोधत आहेत. त्यांची इच्छा पूर्ण होऊन त्यांना सफलता मिळणार आहे. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत देणार हे वर्ष असेल. कामात सफलता मिळणार आहे. राजकारणाशी संबंधीत व्यक्ती तसंच आर्थिक कार्यांशी निगडीत आहेत. त्यांना सफलता मिळणार आहेत. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांचं या वर्षात लग्न होण्याची शक्यता आहे. 

कन्या   

कन्या राशीच्या लोकांना आपल्या  कार्यात उन्नती मिळण्याची शक्यता आहे. जसंजसं वर्ष पूढे जात राहील, तसतस या  राशीच्या लोकांना आर्थीक लाभ मिळत जाणार आहे. जर कोर्टकचेरीचं काम चालू असेल तर जर  सावधगीरी बाळगा.  तसंच  तुमच्या पार्टनर कडून तुम्हाला निराशा मिळण्याची शक्यता आहे. 

तुळ 

 आर्थिक बाबतीत तुम्हाला समृध्दी लाभेल. तसंच तुळ राशीचे लोकं आपल्या कुटूंबाला चांगला वेळ देणार आहेत. या वर्षाच्या मध्यात तुमचे स्वास्थ खराब होऊ शकत. त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक गोष्टींसाठी  तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. 

वृश्चिक 

या वर्षात तुमची आर्थिक स्थिती  सुधारेल तसंच प्रतिष्ठा प्राप्त  होणार आहे. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर या वर्षी तुम्हाला जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. लव्हलाईफ खास असणार आहे. वर्षाच्या शेवटी थोडंस तणावाचं वातावरण असेल .

धनू 

धनू राशीच्या  लोकांसाठी वर्षीच्या सुरूवातीला साडेसाती येण्याची शक्यता आहे. त्यासाठी जर तुम्हाला सफलता हवी असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. शेअर बाजारातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी सल्ला आवश्य  घ्या. जोडीदाराला या वर्षात चांगला वेळ देऊ शकाल. तसंच वैवाहीक जीवन सुरळीत राहील. 

मकर 

 हे वर्ष तुम्हाला सुखासमाधानात जाईल, तसंच तुम्हाला डोकं शांत आणि केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. तसेच आपले सहकारी तुमचे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. परंतु तुमची कठोर मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर त्या परिस्थितीवर मात कराल. 

कुंभ  

या वर्षात नवी काही करण्याची तुमची इच्छा असणार आहे. तसंच तुम्ही या वर्षात जसं वागाल तसं तुम्हाला वेगवेगळे अनुभव येत जातील. जोडीदारासोबत लहान मोठ्या कुरबूरी होत राहतील तसंच नातं अधिक घट्ट होईल. 

मीन-

व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या बौद्धिक क्षमतेचे आणि प्रतिभेचे कौतुक केले जाईल. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी वाट पाहावी लागेल. धार्मिक कार्य किंवा प्रवासामुळे भक्तिभाव निर्माण होऊन मनाची अशांतता दूर होईल. सरकारशी संबंधित कामात यशस्वी व्हाल. या वर्षात तुम्हाला फिरायला जाण्याचा योग येणार आहे. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष