- बा.भो. शास्त्रीस्वावलंबन हा त्याचा गुण आहे. तो कधीच परोपजीवी नसतो. तो कुणाला झिजवत नाही, राबवत नाही. हेच स्वावलंबन स्वत:ला, समाजाला व देशाला मोठं करतं. त्याच्या कष्टातून ईष्ट जन्माला येतं. जीवन सुखी होतं, सुशिक्षित बेकार हा शब्द किती विचित्र आहे. बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा? अशिक्षिताच्या कारखान्यात सुशिक्षित बेकार वॉचमन होतो. स्वत:ची भाकरी न कमवता आईच्या कष्टाच्या भाकरीवर जगणारा सुशिक्षित कसा? वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराज स्वत:च्या पराक्रमाने माऊली किल्ला जिंकतात म्हणूनच त्यांना ‘‘यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत’’ असं समर्थ म्हणाले. इथंच थांबलं नाही तर ‘श्रीमंतयोगी’ असंही म्हटलं आहे. तपात संयम असतो. संयमाला यम घाबरतो. थोडासा संयम असेल तर रोडवर गाड्यांचं अपघाताचं प्रमाण घटेल. मोबाईलचं संकट टळेल. असंयम हाच अवघ्या अपघाताचा जनक आहे व तितिक्षा हीच तपश्चर्या आहे. तपश्चर्या कालबाह्य झाली असं कसं म्हणता येईल? शाश्वतमूल्यं कधीच कालबाह्य होत नसतं. शास्त्रज्ञ संशोधनासाठी घेत असलेले कष्ट, शेतकरी व कामगारांचे कष्ट, सीमेवर लढणाऱ्या जवानांचं समर्पण आई-बाबा हे तपातच मोडतात. एका मराठी भावगीतात परपुष्ट संन्याशाबद्दल म्हटलं आहे.‘‘रुद्राक्षांच्या गळ्यात माळालाविलेस तू भस्म कपाळाकधी न घेऊन नांगर हातीपिकविलेस मातीतून मोतीकाय अभाग्या भगवे नेसूनघर संन्यसून जासी’’आळशी व ऐतखाऊ लोकांमुळे तपाचा अर्थ धूसर झाला. नियमित व्यायाम, वाणीची स्वच्छता, निर्मळ दृष्टी, स्वकष्टार्जित धन, शुद्ध आहार व सहिष्णुता या सद्गुणांचा समूह हचा तपसाधना आहे.
बेकार सुशिक्षित असू शकतो आणि सुशिक्षित बेकार कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 5:08 AM