आपण नेहमीच चांगल्या संधीची वाट बघत आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो. पण अशामुळे आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय कोणताच पर्याय उरत नाही.अनेकदा चांगल्या संधीची वाट बघत समोरून आलेल्या संधी सोडून देतात. ज्याला ते चांगली संधी समजतात ती संधी नसते.म्हणून आलेल्या संधीचा लाभ घ्या. संधी कुठेही कशीही डोकावू शकते. काही महिन्यापूर्वी लांबचा प्रवास करून एका कार्यक्रमात एका दिग्गज नेत्याला भेटून त्याच्या स्टेजवरच पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली.दिग्गज व्यक्ती असल्याने नियोजित कार्यक्रमात च त्यांनी पुरेसा वेळ न दिल्यामुळे माझे पुस्तक प्रकाशन समारंभ राहून गेला. पण जाता जाता त्या व्यक्तीला व त्यांच्या सोबतच्या माजी मंत्र्याला मी पुस्तक भेट देण्याची संधी साधली. त्यांनी प्रवासात हे पुस्तक वाचले व घरी पत्नीला दिले . त्यांच्या पत्नीला माझे पुस्तकएवढे आवडले की त्यांनी मला 5 हजार पुस्तकांची ऑर्डर दिली व व्याख्यानाला बोलावले. .यातून मला खूप काही मिळाल .म्हणून संधी शोधा व ती साध्य करण्यासाठी पाऊले उचला. सतत जागरूक रहा . संधी कशी निर्माण होईल या विचारात रहा .एका अब्जाधीशाची ही कथा . मध्यमवर्गीय तरुण रस्त्याने जात असताना त्याला साबणाचा लिलाव चाललेला दिसला . तो घरात नेहमी वापरला जाणारा साबण होता . त्याने पुढे जाऊन एका दुकानात त्या बँडच्या साबणाची चौकशी केली . दुकानदाराने सांगितले , त्याला २४ रुपये किलो पडेल हाच साबण त्याला आणून दिला , तर काय भावाने घेशील असे दुकानदाराला विचारल्यावर , १८ रुपये किलोने वाटेल तेवढा साबण घ्यायला तो तयार असल्याचे सांगितले . तो तरुण धावतच लिलावाच्या जागी गेला . तिथे लिलाव बोलून त्याला तो १२ रुपये भावाने मिळाला . तो त्याने १८ रुपये किलोप्रमाणे विकून पैसा कमावला । अशी योग्य संधी आपण निर्माण करावी लागते .
आयुष्यातील संधी गमावून कसे चालेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:11 PM