- स.भ. मोहनबुवा रामदासीहल्ली आपण पाहतो लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ताणतणाव (२३१ी२२) आलेला जाणवतो. ताणतणाव आल्यावर हे जाणवतं, पण ताणतणाव येऊच नये यासाठीचे आपले प्रयत्न नेहमीच कमी पडतात. ताणतणावाची अनेक कारणं आहेत.१. अपेक्षांचा डोंगर वाढला : माझं आहे त्यापेक्षा झटपट श्रीमंती आणि प्रॉपर्टीची जबरदस्त लालसा मनात निर्माण झालेली मला पाहायला मिळते.२. स्पर्धा : माझ्यापेक्षा श्रीमंत दुसरा असूच शकत नाही किंवा असणार नाही, यावर खूप ताणतणाव निर्माण होतो. मला मिळालं नाही तरी चालेल, पण दुसऱ्याला मिळू नये, ही ईर्षा प्रचंड ताणतणाव निर्माण करते.३. कर्जबाजारी : ही व्यक्ती प्रचंड तणावग्रस्त असते. वैरीसुद्धा विचार करणार नाही, एवढे तणावग्रस्त विचार ते करतात. दैनंदिन व्यवहाराची नियमावली, आवश्यक ते व तेवढं खर्चावर नियंत्रण ठेवून पैसा आला तरी गरजेपुरता वापरून साधी राहणी स्वीकारली, तर कर्जाचा बोजा कमी होईल. चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी हा विचार मांडला.मेळविती तितुके भक्षिती।ते कठीण काळी मरोन जाती।दीर्घ सूचनेने वर्तती। तेचि भले।।हा विचार करून ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी निश्चितच मदत होते. मी व माझं हा विचार ताणतणावाला वाढवितो. म्हणून समर्थांच्या वचनाप्रमाणे आचरण ठेवावे.आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।मूळ तुटे उद्वेगाचे। येणे रीती।।निर्णयाची घाई असावी, पण घाईचा निर्णय नसावा. कारण काही निर्णय नियतीवर सोपवावेत. आपला रिमोट सद्गुरूंच्या हाती सोपवावा म्हणजे ताणतणावातून बाहेर पडण्यास मदत होते. संस्कारक्षम जीवन, संतुलित आहार व शांत निद्रा या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.
तणावमुक्त कसे जगावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:17 AM