- मकरंद सरदेशमुख
वास्तुशास्त्र हे खुप पुर्वी पासूनचे शास्त्र आहे हे शास्त्र बांधकामासाठी असुन याला खुप नियम लागु आहेत आणि हे मानवी जीवनासाठी खुप उपयुक्त आहे . वास्तुशास्त्र हे निसर्ग नियमावर आधारित असे शास्त्र आहे . घराच्या सुख -शांती साठी वास्तुशास्त्राचा उपयोग होतो ,वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते व आपली संपत्ती ,आरोग्य चांगले टिकुन राहते.
वास्तुशास्त्र हे असे शास्त्र आहे जे सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते . वास्तुशास्त्र हे पाच तत्वांवर अवलंबुन आहे अग्नी ,पाणी ,जमीन ,वायु , आकाश जस एक सुखी वैवाहिक जीवन हे भावी सुखी आयुष्याचा पाया असतो त्याप्रमाणे आपले घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे असणे खुप महत्वाचे आहे. आपल आजुबाजूच वातावरण हे आपल्या आनंद ,संपत्ती तसेच आपल्या येणाऱ्या सुसंधीवर परिणाम करते त्यामुळे आपण जेव्हा घर घेतो / बांधतो तेव्हा ते योग्य त्या वास्तु तज्ञाच्या सल्यानुसार करणे गरजेचे आहे जर आपले घर संतुलित नसेल तर घरामध्ये चिड - चिड , वादविवाद , उदासिनता इ. प्रॉब्लेम्स सुरु होतात.
वास्तुशास्त्राच्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या आयुष्यात खुप मोठे बदल होतात . आपल्या घरातील फर्निचरची ठेवण, रंगसंगती इ . गोष्टी आपले घर वास्तुनियमानुसार बनवायला मदत करतात . आपल देवघर हे ईशान्येला असले पाहिजे देवघर हे कधीही बेड रूम मध्ये नसावे . वास्तुशास्त्राचा सर्वात पहिला नियम म्हणजे आपले घर हे नेहमी स्वच्छ आणि नीट- नेटके असलेच पाहिजे .घरामध्ये कोठेही जाळ्या - जळमटे , गळके नळ , तुटलेली कोणतीही वस्तु किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तु ठेवु नयेत . आपल्या बेडखाली कोणतेही अडगळ-भंगार ठेवु नये त्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होतो . आपले किचन हे आग्नेयेला असले पाहिजे हे आपल्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी उत्तम असते . वास्तुशास्त्राप्रमाणे फक्त दिशा नाही तर आपल्या घरातील डेकोरेटिव्ह वस्तु , पेन्टिंग्स याही गोष्टी आपल्या आयुष्यावर परिणाम करतात . आपल्या बेड समोर आरसा येवु देऊ नये कारण याचा परिणाम आपल्या हेल्थ वर होतो . बेडरूम मध्ये शक्यतो घुबड किंवा घार असणारे पेंटिंग्स टाळावे . पेन्टिंग हे जोडी मध्ये असावे म्हणजेच लव्ह बर्ड , बदक जोडी , दोन गुलाब ज्याच्यामधुन प्रेमाची , आपुलकीची भावना निर्माण होईल . बेड वर असणारी गादी , पांघरून हे एक असावे दोन जोडलेले असु नये . बेडरूम मधील सर्व वस्तु लाईट कलर मध्ये असाव्यात . कॅलेंडर आणि घड्याळ हे नेहमी पुर्व आणि उत्तरेच्या भिंतीवर असावे . घराच्या ईशान्येला तुळस ठेवावी काटेरी झुडपे घरात असु नये अपवाद गुलाबाचे झाड आणि इतर उपयुक्त झाडे आजुबाजूचे वातावरण चांगले आणि प्रसन्न ठेवते . घरातील पैसे आणि दागिने उत्तरेला असावेत . तिजोरी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी आणि तिजोरीचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेकडे उघडणारा पाहिजे .
घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी सुंदर असायला हवा तरच घरात सकारात्मक ऊर्जा टिकुन राहील . आपल्या वैवाहिक जीवनात शांतता आवड व तेज टिकुन ठेवण्यासाठी दिशा खुप महत्वाच्या ठरतात . त्यामुळे आपली वास्तु ( ऑफिस , इंडस्ट्री , बंगला , फार्म हाऊस , शेती ,प्लॉट ) योग्य वास्तुतज्ञाकडुन व्हिझिट करून घेणे खुप महत्वाचे आहे.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)