- नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृह प्रवेश न करता विधिवत योग्य शुभ - मुहुर्ताला वास्तुशांत करून रहायला जावे म्हणजे वास्तू लवकरात लवकर लाभते.
- ग्रह बल वाढविण्यासाठी योग्य वास्तु तज्ञाकडुन आपल्या घराची व्हिजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवुन ग्रह दोष निवारण करून घेणे .
- यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवन शैली , सदवर्तन , नम्रपणा , दानशुरता , संयमी वृत्ती या पाच गोष्टींचा भरपूर उपयोग होतो .
- मुख्य दरवाजाच्या पाठीमागे कपड्यांचे रॅक किंवा किल्ल्यांचे रॅक लावुन ठेवू नये .
- घराच्या मुख्य दरवाजासमोर घरातील कोणत्याही व्यक्तीचा किंवा फॅमिलीचा ग्रुप फोटो लावु नये .
- घरातील फॅमिली फोटो हा दक्षिण किंवा पश्चिम भिंतींवर लावावा म्हणजेच दक्षिण भिंतीवर उत्तरेला तोंड करून आणि पश्चिम भिंतींवर पूर्वेला तोंड करून लावावा.
- घरातील कुटुंबांच्या सुख -समृद्धी साठी फॅमिलीचा एकत्रित फोटो दक्षिण ,पश्चिम भिंतींवर लावावा.
- घरामध्ये सुख -समृद्धी साठी घरातील खोल्यांना वेगवेगळा रंग देऊ नये.
- बेडच्या समोर आरसा किंवा प्रतिबिंब पडेल अशी कोणतीही वस्तू ठेवू नये.
- बेडरूम मध्ये वाहता धबधबा किंवा पाण्याचे चित्र लावू नये.
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये कोठेही बुडत्या जहाजांचे , हेलकावे खाणाऱ्या बोटीचे चित्र लावू नये.
- घरात हॉल अथवा बेडरूम मध्ये आदिवासी रडक्या,अश्रु वाहणाऱ्या, नैराश्य दाखवणाऱ्या अशा कोणत्याही स्त्री-पुरुषांची चित्र लावू नयेत .
- कोणत्याही बेडरूम मध्ये बेडच्या वरती लटकते झुंबर किंवा लॅम्प येऊ देऊ नये.
- घरात बेडरूम मध्ये दक्षिण भिंतीला आरसा येऊ देऊ नये.
- मास्टर बेडरूम मध्ये एकट्या स्त्री, दु:खी,रडलेल्या स्त्रीचे चित्र लाऊ नये. हसती-खेळती चित्र लावावीत .
- घरामध्ये डार्क पिवळा रंग देऊ नये , हा रंग पोटाचे आजार वाढविणारा असतो .
- घरामध्ये भिंतीला लाल भडक रंग देऊ नये यामुळे घरात चिडचिड वादविवाद भांडणे आणि उष्णते संबंधी विकार होऊ शकतात.
- घरामध्ये डार्क गुलाबी , बेबी पिंक असे कलर देऊ नये यामुळे ढेकुण , कृमी किटक , जाळ्या जळमटे , कोळ्याची घरटी असे लागतात .
- घरात सिलिंगला फक्त व्हाईट कलर दयावा, कोणतेही डार्क रंग देऊ नये त्यामुळे आकाश तत्त्व बिघडते.
- घराच्या नॉर्थ आणि ईस्ट भिंतीला डार्क रंग किंवा अवजड फर्निचर ठेऊ नये .