- बा.भो. शास्त्रीवैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं. तिला अपत्य होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, ‘‘अहंतेचे मूळ सकंंदी उपडावे नायका: मग शांंंतीचे रोप लावावे: ए-हवी अंंकुर निघती:’’ वैराग्य चांंगले, पण त्यात दंंभाची दुर्गंधी नको. मी हे सोडलं, ते सोडलं, हे केलंं, ते केलंं. सतत याचा पाढा वाचला की, समाज उबगतो. असा अहंंकार कुणालाच आवडत नाही. सन्मानसुद्धा विरागाला गोड विषासारखा घात करतो. हे विघ्न फुलहार, गोड शब्द व सन्मानपत्रातून येतं व हळूच वैराग्याचा गळा दाबतं.‘‘इन्द्ररियार्थेषु वैराग्यमनहंकार एव चजन्ममृत्यूजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्’’या गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वरीत वैराग्य शब्दावर अत्यंत सुंंदर भाष्य केलं आहे.‘‘वमिलिया अन्ना! लाभ न घोंटी रसनाका आंग न सूये आलिंगना! प्रेताचियाआशा नि:स्पृह लोकांंचा समाजाला काय उपयोग, असंं कुणाला वाटेल, हा विषय केवळ परमार्थीपुरता मर्यादित आहे, हा आपला चुकीचा समज आहे. संंसाराला त्याची गरज आहे. लालसा व वासनेला आवर घालण्यासाठी त्या वृत्तीची आम्हाला गरज आहे. चंचल मन अभ्यास व वैराग्याने स्थिर होतं असंं गीता सांगते. म्हणून ज्ञानाच्या अनुभूतीनंतर वैराग्याचा सूर्योदय झाला पाहिजे. ज्ञानाशिवाय वैराग्य ही बिना बे्रकची गाडी आहे. म्हणून समाज कारण राजकारणी माणसात ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्टÑपुरुष तयार होऊ शकतात.
ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्ट्रपुरुष तयार होऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:45 AM