- डॉ. भूषण कुमार उपाध्यायप्रबंधशास्त्र हे आधुनिक काळाचे एक महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्राचा उपयोग करून ध्येयप्राप्ती करण्यास फार सहजता निर्माण झालेली आहे. हेच कारण आहे की, मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रबंधशास्त्राचा उपयोग सुरू केलेला आहे. या शास्त्राचे इतके महत्त्व आहे की, विश्वातील प्रत्येक विद्यापीठामध्ये हे शास्त्र शिकविले जाते. भारतात पुरातन काळातील ग्रंथांमध्ये प्रबंधशास्त्राची चर्चा केली आहे. कोणत्या कार्यास कशा प्रकारे संपादित करावे याबाबतची चर्चा अनेक स्थानांवर मिळून येते. चाणक्यच्या अर्थशास्त्रापासून ते पुराण आदी ग्रंथांपर्यंत आम्ही प्रबंधशास्त्राच्या अनेक महत्त्वपूर्ण सूत्रांना पाहत आलेलो आहोत.मनाच्या व्यवस्थापनाकरिता ज्या प्रबंधशास्त्राचा उदय झालेला आहे त्यास ‘योगशास्त्र’ असे म्हटलेले आहे़. विस्तार आणि शास्त्रीय पद्धतीने मनाच्या व्यवस्थापनाचा खुलासा हा योगशास्त्रामध्ये केलेला आहे. योगशास्त्राचा महत्त्वपूर्ण ग्रंथ महर्षी पतंजली यांनी लिहिलेला असून त्याचे नाव ‘पतंजली योगसूत्र’ असे आहे. या ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक आणि विशिष्टतापूर्ण मनाच्या व्यवस्थापनाची गोष्ट सांगितलेली आहे. योगसूत्रातील एका सूत्रामध्ये भगवान पतंजली अशा प्रकारे प्रबंधशास्त्राचे मूळ सांगतात -‘स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूÞमि:।’म्हणजेच दीर्घकाळापर्यंत व निरंतर श्रद्धापूर्वक सेवेने आम्ही जे कार्य करतो त्याचा आधार दृढ (पक्का) असतो. भगवान पतंजली यांनी ही गोष्ट मनाच्या अभ्यासाविषयी म्हटलेली आहे, परंतु ही बाब जीवनाच्या सर्व स्तरांवर लागू होत असते. भगवान पतंजली यांनी कोणतेही कार्य धैर्याने करण्यास सांगितलेले आहे. दीर्घकाळासोबत आवश्यक आहे की प्रयत्न हे सतत करत राहावे. म्हणजेच प्रयत्नांमध्ये सातत्य असावे. जर प्रयत्नांमध्ये खंडता निर्माण होत राहिली तर कार्यसिद्धी पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण होईल. याव्यतिरिक्त सत्कार किंवा श्रद्धेची भावना असावी. ज्या कार्यामध्ये श्रद्धेची भावना नसते ते कार्य योग्यरीत्या पूर्ण होत नाही. जे कार्य आम्ही संपादित करणार त्यामध्ये सेवाभाव असावा. जे कार्य दुसऱ्यांच्या हिताकरिता नि:स्वार्थ भावनेने केले जाते ते कार्य महान म्हणून संबोधले जाते़ सरतेशेवटी भगवान पतंजली यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे जे कार्य संपादित होते त्या कार्याची आधारशीला दृढ (पक्की) असते, तसेच ती सिद्ध होत असते. भगवान पतंजली यांचे हे सूत्र महाव्यवस्थापनाचे महाकाव्य होय.
आधुनिक काळातील एक महत्त्वपूर्ण प्रबंधशास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 5:50 PM