शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

आनंदाचा स्रोत सहकार्य नि सहजीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 7:19 PM

जपान हा देश सा-या जगात आगळा वेगळा समजला जातो. याला अर्थातच अनेक कारणं आहेत.

- रमेश सप्रे

जपान हा देश सा-या जगात आगळा वेगळा समजला जातो. याला अर्थातच अनेक कारणं आहेत. राजेशाही जरी नसली तरी आपला राजा हा सूर्यवंशाचा प्रतिनिधी आहे ही त्यांची ठाम समजूत. नव्हे, राजाला देवासारखा मान दिला जातो. पूर्वीच्या पारंपरिक जपानमध्ये प्रत्येक घरात एक छोटीशी खोली असायची. आपल्या देवघरासारखी. तिच्यात सारी साधनसामग्री अतिशय कलात्मक रितीनं मांडलेली असायची. छोटासा पलंग, वारं घेण्यासाठी नक्षीदार पंखा, पाणी पिण्यासाठी भांडी, विश्रंती घेताना घालावयाचे खास कपडे, मुख्य म्हणजे सुंदर अंतर्गत सजावट, त्या खोलीला ‘लोकोनामा’ म्हणत. प्रत्येकाची श्रद्धा असायची, विशेष म्हणजे अतिशय आधुनिक अशा यंत्रमानवीकरण (रोबोटायझेशन) झालेल्या आजच्या काळातही अनेकांची अशी श्रद्धा असते की सध्याचा राजा प्रत्येकाच्या घरात विश्रांती घेण्यासाठी येतो. ही फक्त भावना असेलही पण ती व्यक्त करताना अतिशय कलाकुसर कौशल्याचा उपयोग केला जातो. 

जपानला त्या देशातील लोक ‘निप्पन’ असं म्हणतात. उगवत्या सूर्याचा देश म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. म्हणून त्याचा ध्वजही उगवत्या सूर्याचं दर्शन घडवणाराच आहे. आणखी बरंच काही लिहिता येईल जपान नि जपानी लोकांबद्दल. ब-याच वर्षापूर्वी आर्थर कोएस्लर नावाच्या लेखकानं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं होतं. जपान आणि भारत या दोन देशांचा अनेक दिवस दौरा, निरीक्षण नि अभ्यास करून त्यानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव अतिशय अर्थपूर्ण आहे. ‘द लोटस अँड द रोबो’, ‘कमळ आणि यंत्रमानव (रोबो)’ ही दोन प्रतीकं आहेत ज्याला आपण संस्कृती (कल्चर) आणि सुधारणा (सिव्हिलायझेशन) म्हणतो त्या संस्कृतीचं प्रतीक आहे. ‘कमळ’ आणि तंत्रज्ञानानं घडवून आणलेली क्रांतिकारी सुधारणा तिचं प्रतीक ‘रोबो’. 

त्या वेळी जपाननं (कमळ) संस्कृती चांगली जपली होती आणि तंत्रज्ञानात विशेषत: इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर जपानने खूप प्रगती केली होती. म्हणजे ‘रोबो’- यंत्रमानव -ही मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली होती. भारत मात्र आपली संस्कृती झपाटय़ानं गमावत होता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पिछाडीला होता. असो. 

आज जपानची स्थिती आर्थिक विकासाच्या दृष्टीनं चांगलीच आहे; पण अमेरिकेनं दुस-या महायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर टाकलेले अणुबॉम्ब अन् घडवलेला विध्वंस, त्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा जपान पुन्हा उंच उडू लागला; पण नैसर्गिक आपत्ती मात्र त्याची पाठ अजून सोडत नाहीत. ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामीसारखी राक्षसी सागरलाटा या सारख्या आपत्ती जपानवर अनेकदा कोसळत असतात. तरीही या सा-या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत जपानी लोक अत्यंत आनंदात असतात. काय आहे या आनंदाचं रहस्य? कठोर परिश्रम, शिस्त, वक्तशीरपणा, वेळेची किंमत जाणून सतत कार्यरत राहणं हे तर त्यांच्या आनंदाचं रहस्य आहेच; पण त्यांनी आणखी एक मूल्य आपल्या जीवनशैलीचा भाग बनवलंय. ते म्हणजे परस्पर सहकार्य. सहयोगाचं तत्त्व हे जपानी लोकांच्या आनंदाचा स्नेत आहे. उगम आहे. 

स्पर्धेपेक्षा सहकार्यानं राष्ट्र समर्थपणे उभं करता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान. या तत्त्वाचं दर्शन घडवणारी एक अद्भूत घटना जपानमध्ये घडली आणि समाज माध्यमातून ती सा-या जगानं अनुभवली. त्याचं असं झालं. वारंवार होणा-या भूकंपापासून जीवितहानी होऊ नये म्हणून जपानमध्ये अनेक घरं लाकडाची असतात. त्याची दुरुस्ती सगळेजण ब-याच वेळा स्वत: करतात. असाच एक जपानी माणूस स्वत:च्या घराचं छप्पर दुरुस्त करत होता. त्यानं एक फळी काढली नि काय आश्चर्य! 

फळीमागे जी फट होती त्यात एक जिवंत पाल होती जिच्या पायातून गेल्या दुरुस्तीच्यावेळी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी एक खिळा मारला गेला होता. ज्या वेळी त्या फळीला खिळे ठोकले जात होते त्या वेळी नेमकी ती पाल मध्ये आल्यानं खिळा तिच्या एका पायातून लाकडात ठोकला गेला होता. त्या माणसाला जागेवरून बिल्कुल हलू न शकलेली पाल इतके दिवस जिवंत कशी याचं आश्चर्य वाटत असतानाच त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. दोन तीन पाली निरनिराळ्या बाजूंनी आल्या नि तोंडात असलेलं भक्ष्य (किडे) तिला भरवायला सुरुवात केली. ती पाल का व कशी जिवंत राहिली याचं कोडं उकललं होतं. 

सा-या पाली मजेत इकडे तिकडे फिरून त्या पालीसाठी खाद्य आणत होत्या. यातली सहकार्याची सहसंवेदनेची, सहानुभूतीची भावना थक्क करणारी होती. साध्या कीटक प्राणी या सारख्यांना हे कळतं नि वळतं सुद्धा तर आपण माणसांनी अशी एकरूपतेची समरसतेची भावना इतरांबद्दल जोपासली तर जीवनात दु:ख उरणारच नाही. भावपूर्ण, निरपेक्ष, नि:स्वार्थी सहजीवन हे आनंदाचं जिवंत रहस्य आहे. व्यक्तीच्या तसेच सा:या समाजाच्या आनंदासाठी असा सहयोग आवश्यक आहे. एक प्रकारचा सहयज्ञच आहे हा!

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक