शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्म म्हणजे शरीर, तर धर्म म्हणजे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 13:18 IST

शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात.

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजज्या तत्त्वाच्या अभावामुळे जीवन छिन्न-विछिन्न होते असे मूलभूत तत्त्व म्हणजे धर्म असे आपण समजतो. धर्माचे मुख्य स्वरूप सूक्ष्म आहे. त्यामध्ये कर्म शरीर व धर्म म्हणजे प्राण हीच आपली भावना असते. शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये जो व्यवहार होतो त्याला काही लोक धर्म समजतात. खरं म्हणजे समाजाला त्याच्या आजच्या स्थितीतून आदर्शाकडे घेऊन जाणारा जो विचार आहे तोच धर्मविचार होय. ज्याप्रमाणे कान, डोळे, नाक इत्यादी इंद्रियांच्याद्वारे ‘मन’च निरनिराळ्या रीतीने प्रकट होते त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रकृतीनुसार त्याचा धर्म दिसून येतो. आपण व्यवहाराच्या सर्व शाखांशी धर्माचा संबंध जोडतो. त्यामुळे धर्म आणि व्यवहार यांचा संबंध अमोघ राहिला पाहिजे. खरं म्हणजे माझा धर्म कोणता हे कोण्या शास्त्राकाराची किंवा धर्मग्रंथात शोधायची गरज नाही. मनुष्याला स्वयंभूरीत्या समजून येणारी ती गोष्ट आहे.सहजत्स्फूर्त मानवधर्म विकसित झाला पाहिजे. मनुष्याने मानवधर्माला सोडले नाही पाहिजे. एका विशिष्ट चौकटीत धर्माला स्थान नको. ते विश्वव्यापक स्वरूपाने समाजासमोर मांडले पाहिजे. श्रद्धा, प्रेम-सत्य व त्याग असा रीतीने धर्म समजून घेतला जावा. माणसा-माणसांत विखुरलेल्या समाजाला एकसंघ बनविण्यात धर्माची मदत झाली पाहिजे. मनुष्याला अध्यात्माकडे घेऊन जाणारा धर्म आहे. धर्म आणि अध्यात्म एकाच वस्तूकडे जातात. धर्माचे स्वरूप वेगवेगळे असू शकते; परंतु अध्यात्म एकच असते. अध्यात्माशिवाय शांती नाही. ते एकतत्त्वाला धरत असते. ईश्वरतत्त्वाला जाणायचे असेल तर अध्यात्माशी एकरूप व्हा. कुठल्याही परिस्थितीत न डगमगता आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहून, अध्यात्म जगले पाहिजे. अध्यात्म जगणारा माणूस गौण-मुख्य यापासून निराळा असतो. तो विवेकाला धरून आपले कार्य करीत असतो. अध्यात्म जगताना ज्या अनुभूती येतात त्या पवित्र असतात. त्या अध्यात्म जगणाऱ्याच्या जीवनात प्रकटतात. तो अनुभव प्रकट करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत असते. त्यातूनच त्याचा खरा धर्म कळतो. धर्मानुसारच मग त्याला त्याचे फळ मिळते. मन समाधानात रमून जाते.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आणि सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक