शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

सर्वोच्च ईश्वर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 3:46 AM

श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे

- शैलजा शेवडेअधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरमहृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरममधुराधिपतीचे ओठ मधुर आहेत, वदन (मुख) मधुर आहे, नयन मधुर आहेत, हास्य मधुर आहे, हृदय मधुर आहे, गती मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे.वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरमचलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरमत्याचे बोलणे मधुर आहे. त्याचे चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे, अंगविक्षेप मधुर आहेत, चालणे मधुर आहे, फिरणे मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे.मधुराष्टकातल्या या ओळी ऐकल्या की आपले मन भक्तीरसानं भरून जातं. मधुराष्टक वल्लभाचार्यांनी रचलं. वल्लभाचार्य हे पुष्टिमार्गाचे प्रवर्तक होते.पुष्टी म्हणजे ईश्वराचा अनुग्रह वा कृपा असे भागवतात म्हटलेले आहे. श्रीकृष्ण हा सर्वोच्च ईश्वर असून त्याची पुष्टी हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, असे या संप्रदायात मानलेले असल्यामुळे याला वल्लभ संप्रदाय, शुद्धाद्वैती संप्रदाय, रुद्र संप्रदाय इ. नावेही आहेत. शुद्धाद्वैत तत्त्वज्ञान हा या संप्रदायाचा सिद्धांतपक्ष असून पुष्टिमार्ग हा साधनापक्ष आहे. ईश्वरी कृपेनेच आत्मदर्शन होऊ शकते, हे विचार मुंडक व कठ या उपनिषदांत येऊन गेले आहेत. श्रीकृष्ण हेच सर्वोच्च ब्रह्म असून त्याचे शरीर सच्चिदानंदमय असते. पुरुषोत्तम असा तो कर्ता आणि भोक्ताही असून स्वत:च्या इच्छेने जग निर्माण करतो. विष्णूच्या वैकुंठापेक्षा उच्चस्थानी असलेल्या व्यापिवैकुंठात राहून तो आपल्या भक्तांसह लीला करतो. या व्यापिवैकुंठात गोलोक असून त्यात वृंदावन, यमुनेचे अस्तित्व आहे. या गोलोकात जाऊन तेथील कृष्णलीलांत सामील होणे, हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय होय.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक