शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

जगू आनंदे -या जन्मावर - या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 8:40 PM

भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगा. तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या. 

- डॉ, दत्ता कोहिनकरएका कॅनॉलवरून एक गाढव निवांत चालले होते. मागून आलेल्या एस.टी.चालकाने जोरात हॉर्न वाजवून त्याला घाबरवले. गाढव भितीने पळताना तोल जावून कॅनॉलच्या तुटलेल्या कठडयावरून पाण्यात पडून बुडू लागले. तेवढयात दोन पहिलवानांनी ते दृश्य पाहून पाण्यात उडया मारून गाढवाला बाहेर काढले व बुडताना गाढव जोरजोराने काय ओरडत होते याची विचारणा केली, त्यावेळेस गाढव म्हणाले मित्रांनो मी गटांगळया खाताना ओरडत होतो, ह्यह्यदुनिया बुडाली - दुनिया बुडाली.म्हणजे काय ? याचे स्पष्टीकरण करताना गाढव म्हणाले, साहेब, मी बुडालो म्हणजे दुनिया बुडाली  सिर सलामत तो पगडी पचास या म्हणीचा येथे प्रत्यय येतो म्हणून *आपण संपलो की दुनिया आपल्यासाठी संपलेली असते. म्हणून जोवर आपले अस्तित्व आहे. तोवर आनंदी रहा व स्वतःवर प्रेम करा...देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्याच कर्माचे फळ आहे.. मृत्यू कधी झडप घालील - सगळं गूढच आहे. म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ - सोडून वर्तमानात आनंदाने जगा. तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या. प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा. कुटूंबाबरोबर सहलीला जा.सुट्टी काढून कुटूंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या. आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वार्‍याने उडणार्‍या तिच्या केसांचे, बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता, त्याची पुनरावृत्ती करा. सांगा तिला मनापासून, तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते. प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा. कुटूंबाबरोबर सहलीला जा. सुट्टी काढून कुटूंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या. आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वार्‍याने उडणार्‍या तिच्या केसांचे, बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता, त्याची पुनरावृत्ती करा. *सांगा तिला मनापासून, तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते*. आपल्या आई-वडिलांच्या जवळ बसून आपल्या हाताने त्यांना गोडधोड खाऊ घाला - आज मी जे काय आहे ते तुमच्या दोघांमुळेच असे कृतज्ञतेचे शब्द उच्चारत त्यांच्या चरणाला स्पर्श करा. आपल्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळयातील आनंदाश्रुंना वाट मोकळी करून द्या. आपली चित्रपट पाहण्याची, पुस्तके वाचण्याची, नाटक बघण्याची इच्छा मनसोक्त पुर्ण करून घ्या. कुटूंबाला डिजनी लँड मध्ये घेऊन जा, भरपूर नाचा, पोहण्याची मनसोक्त इच्छा पूर्ण करा, त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना घेऊन द्या. मुलांबरोबर, नातवंडाबरोबर खेळा, बागडा, नातीगोती घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या. एखादया कलेसाठी वेडं होऊन जा त्यातला आनंद उपभोगा. सर्वत्र प्रेमाचा अविष्कार करा.  रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहून आपल्या डोळयात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यु असे दहा वेळा म्हणा. आपल्या शरीरातील 50 ट्रिलियन पेशींना प्रेमाची स्पंदने मिळून उत्साहाची ऊर्जा अमर्याद वाढते. जगात सगळयात महागडा बिछाना कुठला ? तर तो आजारपणाचा बिछाना होय. आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाडयाने मिळतो, सेवेसाठी नोकर मिळतात. पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही नेमू शकत नाही. प्रेम - निस्सीम प्रेम आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवते.हरवलेल्या वस्तू सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं आयुष्य.जीवन‍ खुप सुंदर आहे. त्यावर खुप  प्रेम करा व आनंदाने जगा. या जन्मावर - या जगण्यावर शतदा प्रेम करावे - शतदा प्रेम करावे... 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक