(Image Credit : Social Media)
महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. भाविक भगवान शिवाची पूजा-अर्चना करून महादेवाला प्रसन्न केलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. भाविक या दिवशी पूजा करताना महादेवाच्या पिंडिवर बेलपत्र वाहतात. पण हे का वाहतात याचं कारण अनेकांना माहीत नसतं. याबाबत काही आख्यायिका आहेत.
काय आहे कारण?
हिंदू पुराणांमधील एक प्रचलित कथा आहे. या कथेनुसार, समुद्र मंथनावेळी जेव्हा अमृतसाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी अमृताआधी समुद्रातून कालकूट नावाचं विष निघालं होतं. या विषाने संपूर्ण ब्रम्हांड नष्ट झालं असतं. हे विष केवळ भगवान महादेवच नष्ट करू शकत होते. तेव्हा भगवान महादेवाने कालकूट विष आपल्या कंठात ठेवलं होतं. यामुळेच त्यांचा कंठ निळा झाला होता. त्यामुळेच त्यांचं नाव नीलकंठ पडलं होतं.
पण या विषामुळे भगवान शिवाचं डोकं गरम होऊ लागलं होतं आणि त्यांच्या कंठात जळजळ होऊ लागली होती. त्यांना होणारा हा त्रास पाहून देव चिंतेत होते. त्यांच्या कंठाची जळजळ कमी करण्यासाठी सर्वच देवतांनी त्यांना बेलपत्र खायला दिलं. ज्यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला. तेव्हापासून भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला महत्व आहे. असे मानले जाते की, जे लोक भगवान शिवाला बेलपत्र वाहतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.
महाशिवरात्रीचं महत्व
अशी मान्यता आहे की, काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल(विष) याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.