(Image Credit : YouTube)
नव्या वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. मकरसंक्रांतीला शुभ कार्याची सुरुवात केली जाते. मकरसंक्रांतीला लग्न, नामकरण अशा शुभ कार्यांना सुरुवात होते. सोबतच या दिवशी तिळ आणि गुडापासून तयार लाडूंची चर्चा घराघरात असते. 'तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोल' हे याच दिवसात घराघरात आणि ऑफिसेसमध्ये ऐकायला मिळतं. पण मकरसंक्रांतीला तिळगूळाचं महत्त्व काय आहे हे अनेकांना माहीत नसतं. चला तर मग जाणून घेऊ तिळगूळाचं महत्त्व...
२०१९ मध्ये मकर संक्रात हा सण १५ जावेवारीला साजरा केला जात आहे. तसा दरवर्षी हा सण १४ जानेवारील साजरा केला जातो. या दिवसापासूनच सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो असे मानले जाते. त्यामुळेच मकरसंक्रांतीला वेगळं महत्त्व आहे.
काय आहे आख्यायिका?
एका पौराणिक कथेनुसार, शनि देव पिता सूर्य देवाला पसंत नव्हते. याच कारणाने सूर्य देवाने शनि आणि त्यांची आई छायाला आपल्यापासून वेगळं केलं. याच्या रागात शनि देवाने सूर्य देवाला कुष्ठ रोगाचा श्राप दिला. वडिलांना कुष्ठ रोगाने पीडित बघून यमराजाने तपस्या केली. यमराजाने केलेल्या तपस्येमुळे सूर्य देव कुष्ठ रोगातून मुक्त झाले. पण रागाच्या भरात सूर्य देवाने शनि देव आणि त्यांची आई छायाच्या घराला जाळलं होतं.
पुढे यमराजाने त्याची सावत्र आई आणि भाऊ शनि यांचा अडचणीत पाहून त्यांना जवळ करण्यासाठी सूर्य देवांना समजावले. तेव्हा सूर्य देव शनिला भेटायला त्याच्या घरी गेले. कुंभ म्हणजेच घरात आग लावल्यावर त्या घरातील सगळंकाही जळून राख झालं होतं. फक्त काळे तिळ शिल्लक होते. शनि देवाने वडील सर्य देवाची पूजा काळ्या तिळांनी केली. त्यानंतर सूर्य देवाने शनिला दुसरं घर मकर दिलं.
तेव्हापासून मान्यता आहे की, शनि देवाला तिळामुळेच त्यांचे वडील, घर आणि सुख प्राप्ती झाली. त्यामुळे तेव्हापासून मकरसंक्रांतीला सूर्य देवाच्या पूजेसोबतच तिळाला महत्त्व प्राप्त झालं.
तिळाच्या लाडूचे फायदे
तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, आयर्न, ऑक्लेलिक अॅसिड, अमीनो अॅसिड, प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतं. तर गूळामध्ये सुक्रोज, ग्लूकोज आणि खनिज असतात. जेव्हा दोन पदार्थांना एकत्र केलं जातं, तेव्हा याचे आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.