अध्यात्म म्हणजे आधि आणि आत्म. म्हणजेच सर्वात आधी स्वत:चे आत्मपरिक्षण करा असा याचा अर्थ होतो. स्वत:चे आत्मपरिक्षण करता करता माणसाला जीवनात साक्षात्कार अथवा पूर्णत्त्व प्राप्त व्हावं असू वाटू लागतं. आत्मपरिक्षण करताना आपण म्हणजेच मी कोण ? हा प्रश्न तो स्वत:ला विचारू लागतो. ज्यातून जन्माला येण्यामागचं ध्येय गवसतं आणि त्याच्या ख?्या जीवनाला सुरूवात होते.
आत्मसाक्षात्काराचा हा शोध म्हणजे अध्यात्म होय. ह्यस्वह्णचा शोध घेण्याच्या या प्रवासात माणसाला मार्गदर्शनाची गरज असते. आत्म साक्षात्काराचा हा प्रवास सुखकर करण्यासाठी जे अचूक आणि योग्य मागदर्शन करतात त्यांना 'सद्गुरू' असे म्हणतात. जीवन हे एक प्रकारचे युद्ध आहे. त्यामुळे जीवन जगत असताना माणसाला अनेक आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. हे जीवन युद्ध जिंकण्यासाठी शरीर आणि मनाचे ऐक्य असणं फार गरजचं असतं. कारण शरीराने आणि मनाने साथ दिली तरच तुम्हाला जीवनात सुखी आणि समाधानी होता येतं. जीवनात समोर येणाºया आव्हानांना तोंड देण्यासाठी मन शांत आणि निवांत कसं करायचं हे अध्यात्म विद्या शिकवते.
अध्यात्म विद्या ही जीवनाचा एक छोटा पंरतू अत्यंत महत्वाचा आहे. जर तुमच्या कडे इतर सर्व कला असतील मात्र जीवन जगण्याची कलाच नसेल तर जीवन युद्ध यशस्वीपणे जिंकता येणं कठीण आहे. यासाठीच जीवनाचे सार्थक होण्यासाठी माणसाला अध्यात्म विद्या माहित असणं गरजेचं आहे. जगातील अनेक थोर तत्त्वज्ञांनी आपले अनुभव आणि सुविचारांची शिदोरी जनमाणसाला दिलेली आहे. हे सुविचार माणसाला जीवन जगण्याचं बळ देतात. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही थोर संत आणि तत्वज्ञांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.- ह.भ. प. सुधाकर इंगळे महाराज,सोलापूर