जगातील मानस माध्यमांमध्ये अमेरिकेच्या लिओनारा पायपरचा क्रमांक सर्वांत वरचा लागतो. अमेरिका व इंग्लंडमध्ये सन १८८५ ते १९१५ या कालावधीत एस. पी. आर.च्या सभासदांनी तिचा अभ्यास केला. तिने मेलेल्या माणसाबाबत काहीवेळा जी माहिती दिली ती इतकी अचूक होती की त्या संशोधकांनी तिच्यापाठी गुप्तहेर लावले व तिचे टपालही तपासण्यात आले. परंतु त्यात त्यांना गैर असे काहीच आढळले नाही. तिच्या पूर्ण व्यवसायात माध्यम म्हणून तिने जे काही केले त्यात काहीच चुकीचे आढळले नाही.
भौतिक माध्यमांचे नाव खराब झाल्यावर दुसऱ्या प्रकारची माध्यमे उदयास आली. काहींनी इतकी अचूक माहिती दिली की कुठल्याही अन्य प्रकारे त्यांना ती मिळू शकली नसती. मनाच्याद्वारे प्रयोग करणाऱ्या माध्यमांमुळे एक नवीन प्रकारचे कुतूहल अध्यात्मवादाविषयी तयार झाले. अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, मानसतज्ज्ञ व अधिभौतिक विषय हाताळणाºया लोकांनी याचे संशोधन केले. खूपशी माध्यमे स्वत:च्या धुंदीत काम करीत असत. धुंदीत जाणे म्हणजे नेमके काय? धुंदीचे वेगवेगळे प्रकार कोणते? व ते कसे साधले जातात? धुंदी म्हणजे खरेतर मनाची एक बदललेली अवस्था असून त्यात बाह्यमन हे अंतर्मनापासून वेगळे होते. बाह्यमनाचे काम थांबून अंतर्मन करू लागते. धुंदी ही गुंगी आणणारे माध्यमे किंवा मज्जातंतूंवर कार्य करणारी औषधे आणू शकतात. संगीत व नाचणेही आणू शकतात.
श्वासोच्छ्वासाचे प्रकार ज्यात खोलवर श्वास घेण्याचा व्यायाम करण्यात येतो ते देऊ शकतात. डोक्यावर झालेली इजा किंवा मोठा अपघातही धुंदी आणू शकतात. धुंदी ही वरवरची किंवा खूप खोलवरची असू शकते. माध्यमावरील प्रभावही कधीकधी शरीराची व आवाजाच्या मनाची पकड घेण्यास भाग पाडतो.- डॉ. मेहरा श्रीखंडे