विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथराजात मनाच्या रंग-रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘वाऱ्याने ढग आणले जातात व वाºयानेच दूर नेले जातात. तसेच बंधन वा मुक्ती मनानेच कल्पिली जाते. तम व रजाच्या बंधनामुळे मन मलिन होऊन बंधाला कारण होते आणि मनातून तम नाहीसा झाला म्हणजे मन सत्त्वगुणी होऊन मुक्तीला कारण होते.’ खरंच, मन जेव्हा उच्च विचारांच्या पातळीवरून भरारी घेऊ लागते तेव्हा गगनाला गवसणी घालते. मन नावाचा पक्षीराज जेव्हा उंच-उंच गगने आक्रमणू लागतो तेव्हा वासना-विकारांचा शूद्र पसारा आपोआपच ठेंगणा होऊ लागतो. उलट या पक्षीराजाला जर वासना-विकारांच्या पिंजºयात कोंडून ठेवले तर आकाशी झेप घेण्याची शक्तीच तो हरवून बसतो. मनाच्या रंग-रूपाचा ठाव संसाराचा परित्याग करणाºया संत-महंतांनाही लागला नाही.
मनच प्रतिमा स्थापन करते अन् मनच ती प्रतिमा मोडून टाकते. एका बाजूला मन एवढे चंचल आहे की, वाहणाºया वाºयाची मोट वा गाठोडे बांधता येईल, पण मनाला स्थिर करणे अवघड आहे. तरण्याबांड खोंडाला हिरव्यागार कुरणासमोर बांधावे अन् गवताला तोंड लावायचे नाही, असा दम भरवावा तसेच मनाच्या खोंडाचे आज झाले आहे. साधकाच्या भोवतीने भौतिक विश्वातील विषय विकारांचे हिरवे-हिरवे गार गालीचे अंथरले जात आहेत, अन् साधक मात्र यापासून अलिप्त असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्तकेली जात आहे. ज्याचे वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात,
मन वढाय-वढायउभ्या पिकातलं ढोरकिती हाकला ऽ हाकला ऽपुन्हा येतं पिकावर।।- प्रा. शिवाजीराव भुकेले